Shrikant Shinde Video : स्वतःच्या सुरक्षेसाठी गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करावा असा आपल्या देशात आणि राज्यात नियम आहे आणि हे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत. मात्र नुकतंच सोशल मीडियावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये खासदार शिंदे हेल्मेट न घालता बाईक चालवताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील आता पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासुन पोलिसांकडून कल्याण डोंबिवलीत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या बाईटस्वारांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या (CCTV) माध्यमातून देखील कारवाई करत आहे. अशातच खासदार शिंदे यांच्याकडून वाहतुकीचे नियम मोडण्यात आल्याने आता कल्याण डोंबिवली पोलिसांकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
खासदार शिंदे विना हेल्मेट व्हाईट रंगाची बीएमडब्ल्यू बाईक चालवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी देखील खासदार शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता श्रीकांत शिंदे यांच्यावर पोलिसांकडून काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Shrikant Shinde Video
तर जर स्वतः खासदारांनी वाहतुकीचे नियम मोडेल तर सर्वसामन्य जनता वाहुतकीचे नियम कसे फॉलो करणार? आणि नियम मोडल्यावर जी कारवाई सर्वसामान्य नागरिकांवर करण्यात येत तीच कारवाई आता खासदार शिंदे यांच्यावर होणार का? असे प्रश्न आता सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :