🕒 1 min read
Amol Mitkari । अकोला : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आमदार अमोल मिटकरी यांनीही फोटो ट्विट करत महायुती सरकारला धारेवर धरले होते. त्यावरुन, नितेश राणेंनी अमोल मिटकरी यांचं हिंदुत्त्व तपासण्याची वेळ आलीय, तसेच, मिटकरींना हिंदू धर्मातून हाकलण्याची वेळ आलीय असे राणेंनी म्हटलं होतं.
यावरून राणे- मिटकरी यांच्यात जुंपली आहे. अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, त्यांना नेपाळला पाठविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता उत्सुक असल्याचं म्हटलंय.
अमोल मिटकरी म्हणतात, ”नितेश राणे सारख्यांनी आपल्याला हिंदूत्व शिकवू नये. तसेच, मालवणच्या पुतळा प्रकरणावर चकार शब्द न बोलणारे नितेश राणे या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच असे वक्तव्य करीत आहेत. राणेंनी हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र आणि किती पुराणं आहेत, याचं उत्तर दिलं तर त्यांना आपण खरं हिंदू समजू. तसेच, महाराष्ट्रातील जनता नितेश राणेंना नेपाळमध्ये पाठवायला उत्सुक” असल्याचे Amol Mitkari म्हणाले.
Mahayuti | Amol Mitkari VS Nitesh Rane
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील बॉसला खुश करण्यासाठी पुतळा पाडला; दिपक केदार यांच्या दाव्याने राजकारण हादरले
- शिवरायांचा पुतळा पडला नाही तो पाडलाच होता; दिपक केदार यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ
- ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवादी कसे ओळखायचे? किरण मानेंनी सांगितली हुकमी ट्रीक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












