Share

लाडक्या बहिणींचा हिरमोड? आयोगाचा सरकारला दणका; आता खात्यात येणार फक्त ‘इतके’ पैसे!

निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय दिला आहे. डिसेंबरचे पैसे मिळणार असले तरी जानेवारीच्या ॲडव्हान्स हप्त्याला मात्र ‘ब्रेक’ लागला आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana Update: जानेवारीचे पैसे मिळणार नाही? आयोगाचा निर्णय

🕒 1 min read

मुंबई – “मकर संक्रांतीला खात्यात ३००० रुपये खणखणणार?” या आशेवर असलेल्या लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारने दिलेली ‘गोड बातमी’ खरी ठरेल असं वाटत असतानाच, निवडणूक आयोगाने सरकारला मोठा चाप लावला आहे. महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आता बहिणींच्या खात्यात पैशांची गणिते बदलणार आहेत.

भाजप नेते गिरीश महाजन आणि इतर नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दावा केला होता की, १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी असे मिळून ३००० रुपये जमा होणार. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या आनंदात आता विरजण पडलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, आचारसंहितेत नियमित हप्ता देता येईल, पण जानेवारी महिन्याचा ॲडव्हान्स हप्ता देण्यास सक्त मनाई (Red Signal) आहे.

Ladki Bahin Yojana Payment Update

काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी आयोगाकडे धाव घेत तक्रार केली होती. “१५ जानेवारीला मतदान असताना १४ तारखेला ३००० रुपये जमा करणे, हे मतदारांना प्रलोभन दाखवण्यासारखे आहे,” असा आक्षेप त्यांनी नोंदवला.

मुख्य सचिवांच्या अहवालानंतर आयोगाने मधला मार्ग काढला आहे. त्यानुसार, डिसेंबरचे १५०० रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा (कारण ही योजना आधीच सुरू आहे) आहे. तसेच, जानेवारीचे १५०० रुपये आताच मिळणार नाहीत (हे पैसे ॲडव्हान्स असल्याने आयोगाने रोखले) आणि आचारसंहितेमुळे नवीन महिलांची नोंदणी करता येणार नाही.

त्यामुळे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना ३००० ऐवजी आता फक्त डिसेंबरचे १५०० रुपयेच मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर आयोगाचा हा निर्णय सत्ताधारी महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)