🕒 1 min read
K Annamalai- “पाय तोडण्याची भाषा कसली करता? मी मुंबईत येणारच, तुम्हाला काय करायचंय ते करा…” हे आक्रमक शब्द आहेत तामिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई (K Annamalai) यांचे. ‘मुंबई महाराष्ट्राची नाही’ या विधानावरून सुरू झालेला वाद शमण्याऐवजी आता अधिकच चिघळला आहे. अण्णामलाई यांनी थेट ठाकरे बंधूंवर निशाणा साधत त्यांना ‘मूर्ख’ ठरवलंय, ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा Political Drama रंगण्याची चिन्हं आहेत.
नेमकं काय घडलं?
मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या एका विधानावरून ‘सामना’तून आणि राज ठाकरेंकडून जोरदार टीका झाली होती. ‘मुंबईत आलात तर पाय तोडू’, अशा स्वरूपाचा इशाराही देण्यात आला होता. याला उत्तर देताना अण्णामलाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले, “माझ्यावर टीका करणारे लोक मूर्ख आहेत, त्यांना विषयाची मूळ समजच नाही. सामनामध्ये माझे पाय तोडण्याची भाषा केलीय, पण मी असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही.”
बाळासाहेबांचा आदर, पण वारसदारांवर टीका
एकीकडे संघर्षाची भाषा करताना दुसरीकडे अण्णामलाई यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल (Balasaheb Thackeray) आदर व्यक्त केला आहे. “बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण सध्याचे वारसदार (राज आणि उद्धव) केवळ वडिलांच्या नावाचं नुकसान करत आहेत. त्यांच्याकडे सध्या काहीच काम नाही, म्हणून ते इकडे-तिकडे फिरत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
K Annamalai Open Challenge to Raj Thackeray
वादग्रस्त विधानाचं स्पष्टीकरण देताना अण्णामलाई म्हणाले की, “नरेंद्र मोदींना आपण भारताचे नेते म्हणतो, याचा अर्थ ते गुजराती राहत नाहीत का? तसंच मुंबईला ‘जगाची राजधानी’ म्हटलं तर ती मराठी माणसाची राहत नाही का? हा शहराचा गौरव आहे. मात्र, टीकाकारांनी याचा विपर्यास केला.” अण्णामलाईंच्या या Open Challenge मुळे आता ठाकरे गट आणि मनसे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक..”; शिंदेंच्या नेत्याला सुनावताना भाजप नेत्याची जीभ घसरली!
- “महाराष्ट्रात निवडणुका, पण गाड्या परप्रांतीय?”; भाजपच्या ‘त्या’ गाड्या पाहून संताप, भाडं ऐकून डोळे फिरतील!
- “शिंदे जिगरी, अजितदादा जवळचे, पण उद्धव ठाकरे…”; फडणवीसांनी लावली मित्रांची ‘रँकिंग’, ठाकरेंबद्दल मोठं विधान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










