Share

IND vs NZ: वडोदऱ्यात भारत की न्यूझीलंड, कोण मारणार बाजी? रोहित-विराट पुन्हा ‘विराट’ विक्रम करणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. वडोदऱ्याच्या मैदानावर होणाऱ्या या लढतीत रोहित-विराटची बॅट तळपणार का?

Published On: 

New Zealand Playing 11 vs India | Shubman Gill | ind vs nz

🕒 1 min read

IND vs NZ – आफ्रिकेतील विजयानंतर टीम इंडियाचा ‘जोश’ हाय आहे, पण समोर न्यूझीलंडचं आव्हान सोपं असेल का? क्रिकेटच्या मैदानात कधी काय घडेल, हे ब्रह्मदेवालाही सांगता येत नाही, म्हणतात ना, तसाच काहीसा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा श्रीगणेशा ११ जानेवारी २०२६ (रविवार) रोजी वडोदऱ्याच्या बीसीए स्टेडियमवर होत आहे. दुपारी १:३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

IND vs NZ Match Preview

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा आणि विराट कोहलीने जो धुमाकूळ घातला, तोच फॉर्म ते घरच्या मैदानावर कायम ठेवणार का? याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे डोळे लागले आहेत.

माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण, यावेळी त्याच्यासमोर काईल जेमिसन नावाचं आव्हान असेल. जेमिसन नवीन चेंडूने रोहितला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, तर हिटमॅन आपल्या पुल शॉटने त्याला उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, विराट कोहली (Virat Kohli) आणि न्यूझीलंडचा कर्णधार मायकल ब्रेसवेल यांच्यातील द्वंद्वही पाहण्यासारखं असेल. विराटने आफ्रिकेविरुद्ध खोऱ्याने धावा ओढल्या आहेत, त्यामुळे वडोदऱ्यातही त्याच्या बॅटमधून ‘विराट’ खेळीची अपेक्षा आहे.

भारताच्या गोलंदाजीची मदार अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि हर्षित राणा या युवा खांद्यावर आहे. न्यूझीलंडचा भरवशाचा फलंदाज डेव्हॉन कॉनवेला रोखण्याचं मोठं चॅलेंज अर्शदीपसमोर असेल. तर, डॅरिल मिचेलसारख्या अनुभवी खेळाडूला शांत ठेवण्यासाठी हर्षित राणाला अचूक टप्पा पकडावा लागेल.

हवामान काय सांगतंय?

वडोदऱ्यातील क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे, सामन्यावर पावसाचं अजिबात सावट नाही. तापमान २८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, त्यामुळे सामना पूर्ण ५०-५० षटकांचा होईल यात शंका नाही.

२०२३ पासून भारताने वनडेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं आहे. हा रेकॉर्ड कायम राहणार की किवी टीम इंडियाला त्यांच्याच घरात धक्का देणार? हे रविवारीच समजेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)