🕒 1 min read
वडोदरा: क्रिकेट फॅन्स, तयार आहात ना? भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेचा थरार आता काही तासांवर येऊन ठेपलाय. नुकतंच साऊथ आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर टीम इंडिया आता आपल्या घरच्या मैदानात किवींना अस्मान दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. पण हा सामना टीव्हीवर आणि मोबाईलवर नक्की कुठे आणि कसा पहायचा, याचं टेन्शन आलंय? चिंता नको, ‘इथे’ तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगची A टू Z माहिती मिळेल.
नव्या दमाची टीम इंडिया आणि ‘कॅप्टन’ गिल नियमित कर्णधार Shubman Gill च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ मात्र काहीसा नवखा वाटतोय. वेस्ट इंडिज दौऱ्यातील थकवा आणि दुखापतींमुळे त्यांनी अनेक सिनियर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तरीही, ब्लॅककॅप्सना हलक्यात घेऊन चालणार नाही, कारण क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काहीही होऊ शकतं.
IND vs NZ 1st ODI Live Streaming
सामना कधी आणि कुठे?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना 11 जानेवारीला खेळवला जाईल. वडोदरा येथील BCA स्टेडियमवर दुपारी 1:30 वाजता या हायहोल्टेज ड्रामाला सुरुवात होईल.
TV वर सामना कुठे दिसणार?
तुम्ही घरी बसून टीव्हीवर मॅचचा आनंद घेणार असाल, तर Star Sports Network वर याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. Star Sports 1, Star Sports 1 Hindi सह प्रादेशिक भाषांमधील चॅनेल्सवरही कॉमेंट्री उपलब्ध असेल.
मोबाईलवर फ्री मध्ये कसं पहाल?
मोबाईलवर Jio Hotstar ॲप आणि वेबसाईटवर या सामन्याचे Live Streaming उपलब्ध असेल. जिओ, एअरटेल किंवा व्हिआय (Vi) चे सिमकार्ड वापरणारे युजर्स डेटा प्लॅननुसार हा सामना मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा स्मार्ट टीव्हीवर एन्जॉय करू शकतात.
त्यामुळे टीम इंडियाची ही ‘होम सिरीज’ मिस करू नका, कारण घरच्या मैदानात ‘मेन इन ब्लू’चा रेकॉर्ड तोडणं कोणालाही सोपं नाही!
📌 महत्वाच्या बातम्या
- शुभमन गिलचं टेन्शन वाढणार? जयस्वालला टीम इंडियात फिक्स होण्यासाठी दिग्गजाचा ‘हा’ गुरुमंत्र!
- ‘बॉम्बे’ महाराष्ट्राचं शहर नाही? भाजप नेत्याच्या वक्तव्याने मुंबईत आगडोंब; विरोधकांच्या हाती आयतं कोलीत!
- पुण्यात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर; भाजपचं टेन्शन वाढवणारी ‘ती’ बातमी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










