अभिनेता इमरान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; आंदोलनातील सहभाग पडला महागात

आंदोलनात सहभागी झाल्याने अभिनेता इमरान खानला मुंबई पोलिसांनी २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याची नोटीस बजावली असून, त्याच्या OCI कार्डवरून आता चर्चा सुरू झाली आहे.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 15 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी होणे अभिनेता इमरान खानला महागात पडले आहे. मुंबई पोलिसांनी आमिर खानचा भाचा असलेल्या इमरानला २८ ऑक्टोबरपर्यंत थेट भारत सोडून जाण्याची नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

१० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक जमले होते. या आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. याच दरम्यान पोलिसांनी इमरान खानसह अनेकांना ताब्यात घेतले होते. इमरानच्या आंदोलनातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चौकशी आणि कारवाईची मागणी केली होती.

या सर्व प्रकारानंतर आता OCI (ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया) कार्डधारकांच्या अधिकारांबाबत चर्चा सुरू झाली आहे. इमरान खान हा भारतीय नागरिक नसून त्याच्याकडे OCI कार्ड आहे. या योजनेअंतर्गत भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यासाठी आजीवन व्हिसा मिळतो. मात्र, त्यांना मतदान करण्याचा, संसद किंवा विधानसभेचे सदस्य होण्याचा आणि घटनात्मक पदे भूषवण्याचा अधिकार नसतो.

OCI कार्डधारक व्यक्ती परदेशी पासपोर्ट धारण करणारी असते. त्यामुळे अशा नागरिकांना भारतातील राजकीय आणि सार्वजनिक आंदोलनांमध्ये सहभागी होण्याबाबत परदेशी नागरिकांचे नियम व अटी लागू होतात. तसेच पत्रकारिता, संशोधन, धार्मिक प्रचार आणि काही अन्य विशिष्ट कामांसाठी त्यांना पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मुंबई पोलिसांनी अभिनेता इमरान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत थेट भारत सोडून जाण्याची नोटीस बजावली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही