Share

सोनं-चांदीने रेकॉर्ड मोडले; एका दिवसात १४,००० ची वाढ! दर ऐकून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! चांदी १४,४७५ रुपयांनी महागली, तर सोन्याचा भाव १.४४ लाखांवर. वाचा लेटेस्ट रेट्स.

Published On: 

Gold Silver Price

🕒 1 min read

दिल्ली (Gold Silver Price) – लग्नसराईच्या तोंडावर सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. कारण, सोन्या-चांदीच्या दरात आज जी वाढ झालीये, ती पाहून ‘सोनं घ्यायचं तरी कसं?’ असा प्रश्न ग्राहकांना पडलाय. आज सराफा बाजारात (Bullion Market) अक्षरशः दरांचा भडका उडाला असून सोन्याने आणि चांदीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात एकाच दिवसात २८८३ रुपयांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. यामुळे जीएसटीसह (with GST) एक तोळे सोन्याचा भाव आता १,४४,२०५ रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याने १ लाख ४४ हजारांचा टप्पा ओलांडल्याने दागिने बनवणे आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे.

सोन्यापेक्षाही आज चांदीने जास्त ‘भाव’ खाल्ला आहे. चांदीच्या दरात एका दिवसात तब्बल १४,४७५ रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. या वाढीमुळे जीएसटीसह एक किलो चांदीची किंमत आता २,६५,००१ रुपये झाली आहे. ७ जानेवारीचा २ लाख ४८ हजारांचा रेकॉर्ड मोडून चांदीने नवीन उच्चांक गाठला आहे.

दागिन्यांसाठीच्या सोन्याचे (22 Carat) दर काय?

मराठी घरात लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी २२ कॅरेट सोन्याला पसंती दिली जाते. आज २२ कॅरेट सोन्यातही २६४१ रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीसह याचा दर १,३२,०९२ रुपये प्रति तोळा झाला आहे.

भाव का भडकले?

आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेला भूराजनैतिक तणाव आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीची शक्यता यामुळे सोन्याला ‘Safe Haven’ म्हणून पसंती मिळत आहे. तसेच, इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि सोलर पॅनेलमध्ये चांदीची Industrial Demand वाढल्याने चांदीचे दर गगनाला भिडले आहेत.

(टीप: येथे दिलेले दर IBJA च्या माहितीवर आधारित आहेत. शहरानुसार दरात तफावत असू शकते. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)