Share

आकाशवाणी भवनात घुसल्याप्रकरणी राहुल आणि प्रियंका गांधींवर दिल्लीत गुन्हा दाखल

इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे.

Published On: 

Rahul and Priyanka Gandhi during protest

प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्याच्या विरोधात इंडिया आघाडीने दिल्लीत हे आंदोलन पुकारले होते. संसदभवन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात इंडिया आघाडीचे १४० खासदार सहभागी झाले होते. आंदोलकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसू नये यासाठी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी हा मोर्चा आकाशवाणी भवनापासून ४०० मीटर अंतरावरच अडवला. त्यामुळे राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांनी संध्याकाळपर्यंत तिथेच ठिय्या आंदोलन केले. काल रात्री दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना आणि इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतले होते, मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

पोलिसांनी सुटका केल्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर त्यांनी आकाशवाणी भवनाकडे कूच केली. पोलिसांनी अडवल्यानंतरही कुणालाही न जुमानता त्यांनी इमारतीत प्रवेश केला, याच कारणावरून दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर (Rahul Gandhi) गुन्हा दाखल केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही