Share

बंगळूरुमध्ये SIR प्रक्रियेविरोधात ८ ऑक्टोबरला आंदोलन; ध्रुव राठी सहभागी होणार

बंगळूरुमध्ये एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी ८ ऑक्टोबरला आंदोलन होणार आहे. यात ध्रुव राठी सहभागी होणार असून प्रकाश राज यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

Published On: 

Protest against SIR process in Bengaluru Freedom Park | Dhruv Rathee

बंगळूरु, 8 ऑक्टोबर: बंगळूरु येथील फ्रीडम पार्कमध्ये एसआयआर (SIR) प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके करणार असून, यामध्ये ध्रुव राठी (Dhruv Rathee) देखील सहभागी होणार आहे.

अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे ध्रुव राठीच्या उपस्थितीची घोषणा केली. त्यांनी जास्तीत जास्त लोकांना या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडिओत प्रकाश राज यांनी ‘सिंघम’ चित्रपटातील डायलॉग वापरून ज्ञानेश कुमारांना आव्हान दिले. एसआयआर प्रक्रिया हा केवळ मतदानाचा प्रश्न नसून, तो लोकशाही आणि संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे, असे मत प्रकाश राज यांनी व्यक्त केले.

या आंदोलनात ओइशी घोष, नेहा बोरा यांच्यासह विविध युवा संघटना, नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि कर्नाटकातील एसआयआर प्रक्रियेमुळे प्रभावित झालेले नागरिक उपस्थित राहतील, असे प्रकाश राज यांनी सांगितले. तसेच, स्वतः प्रकाश राज, विविध संघटनांचे सदस्य आणि स्थानिक रहिवासी ८ ऑक्टोबरच्या या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

बंगळूरु येथील फ्रीडम पार्कमध्ये ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता हे आंदोलन होणार आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही