Share

“सत्तेचा माज की कायद्याचा बडगा? ‘त्या’ एका पोस्टमुळे डॉ. संग्राम पाटलांवर गुन्हा; पवार ॲक्शन मोडवर!”

भाजप नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी डॉ. संग्राम पाटलांवर मुंबईत गुन्हा दाखल. रोहित पवारांनी दिला सरकारला थेट इशारा, तर विरोधकांचा संताप.

Published On: 

Dr Sangram Patil FIR

🕒 1 min read

मुंबई – लंडनहून आलेल्या डॉ. संग्राम पाटील यांच्या एअरपोर्टवरील चौकशीने आधीच राजकारण तापलं असताना, आता त्यांच्यावर २०२३ च्या कलम ३५३(२) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. भाजप नेत्यांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून सरकारला धारेवर धरले आहे.

एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात ‘शहर विकास आघाडी’ आणि ‘डॉ. संग्राम पाटील’ (Dr. Sangram Patil) या फेसबुक पेज चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी ही तक्रार दिली आहे. १४ डिसेंबर रोजी या फेसबुक पेजेसवरून भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलीन होईल आणि समाजात द्वेष पसरेल, अशा आशयाच्या पोस्ट्स करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, यात एका महिलेबाबतही आक्षेपार्ह लेखन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३५३(२) अन्वये हा गुन्हा नोंदवला असून, यात दोषी आढळल्यास ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

Dr Sangram Patil Cyber Crime FIR

विरोधकांचा एल्गार

“ही दडपशाही खपवून घेणार नाही” या कारवाईचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. डॉक्टर पाटील यांना विमानतळावर रोखणे आणि गुन्हा दाखल करणे याला विरोधकांनी ‘सत्तेचा गैरवापर’ म्हटले आहे.

रोहित पवार (Rohit Pawar): आमदार रोहित पवार यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे. ते म्हणाले, “ही कारवाई महाराष्ट्राची मान खाली घालणारी आहे. डॉ. पाटलांची तत्काळ सुटका करा, अन्यथा उद्या मला स्वतः त्या ठिकाणी यावं लागेल.”

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur): काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी “भारतात लोकशाही जिवंत आहे का?” असा संतप्त सवाल करत या कारवाईचा धिक्कार केला आहे. डॉ. पाटील यांना नेमकी कोणत्या कारणामुळे अटक केली, याचा मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाने तातडीने खुलासा करावा.

निखिल वागळे (Nikhil Wagle): ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी याला “बिनडोक कारवाई” म्हणत, “भाजपवर टीका केली म्हणून ही पोलीस चौकशी आहे का? फडणवीसांनी अक्कल गहाण टाकली आहे का?” अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

असीम सरोदे (Asim Sarode): कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी याला “छळवाद” संबोधले असून, पोलिसांनी राजकीय दबावाखाली काम करू नये, असा सल्ला दिला आहे.

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, सायबर पोलीस संबंधित आयडींचे ‘कनेक्शन’ शोधत आहेत. मात्र, एका सोशल मीडिया पोस्टवरून सुरू झालेला हा वाद आता ‘भाजप विरुद्ध मविआ’ असा रंगला आहे.

FIR LINK – https://x.com/rajuparulekar/status/2009939483731615980?s=20

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)