🕒 1 min read
पुणे – राजकारणात मैत्री आणि दुश्मनी कधीच कायम नसते, असं म्हणतात. पण सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू, हे कोडं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच सोडवलं आहे. एका कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारताना फडणवीसांनी आपल्या मित्रांची चक्क ‘रँकिंग’च लावली आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं विधान सध्या चांगलंच चर्चेत आलंय.
एकनाथ शिंदे ‘बेस्ट फ्रेंड’, अजितदादा दोन नंबरवर!
आपल्या जवळच्या मित्रांबद्दल बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “माझे सर्वात जवळचे मित्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. त्यांच्या खालोखाल नंबर लागतो तो अजित पवारांचा (Ajit Pawar).” मात्र, राज ठाकरे हे राजकारणापलीकडचे मित्र असून उद्धव ठाकरे हे आता ‘दुरावलेले मित्र’ असल्याचं त्यांनी मान्य केलं.
“उद्धव ठाकरेंना ‘ईगो’चा प्रॉब्लेम”
मैत्रीवर बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) शेलक्या शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे हे ‘अनप्रेडिक्टेबल’ आहेत. त्यांना ‘ईगो प्रॉब्लेम’ आहे. आपल्या ईगोसाठी ते स्वतःच्या घरालाही आग लावून मज्जा पाहू शकतात.” मात्र, असं असलं तरी १६ जानेवारीनंतर आम्ही एकत्र चहा पिताना दिसू, कारण आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“१ लाख रुपये घेऊन या”
ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य करताना, “उद्धव ठाकरेंशी युती करून राज ठाकरेंना काहीच फायदा होणार नाही. उलट अजितदादांचा स्ट्राईक रेट (Strike Rate) हा या दोघांपेक्षा जास्त असेल,” असा दावा फडणवीसांनी केला. दरम्यान, विकासाच्या मुद्द्यावरून त्यांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं. “मी मुंबई सोडून सर्वत्र विकासावरच बोलतोय, त्यामुळे माझे पैजेचे १ लाख रुपये घेऊन या,” असा टोलाही त्यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘नाटकं बघतोय आणि करतोय सुद्धा…’; गिरीजा ओकच्या गुगलीवर फडणवीसांचे सिक्सर
- IND vs NZ: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का! पंतनंतर आता ‘हा’ मॅचविनरही मालिकेतून बाहेर
- नाशिकमध्ये खाकीला काळिमा; २ लाखांच्या लाचेसाठी दोन फौजदार पसार, नेमकं काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










