प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, आघाडीतील मित्रपक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये पुणे पदवीधर व शिक्षक, नागपूर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि मविआमध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातही मविआचे दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत, जिथे शरद पवार गट आणि ठाकरे गट या दोघांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातही ठाकरे गट आणि शरद पवार गट आमनेसामने आल्याने काँग्रेस कोणाला साथ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर काँग्रेसने प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा दिल्याने शिवसेना ठाकरे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी थेट जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
कल्याण काळे यांना यापुढे लोकसभा निवडणूक लढवायची नाही का, असा संतप्त सवाल खैरे यांनी उपस्थित केला आहे. काळे यांनी कोणाला विचारून हा पाठिंबा दिला, अशी विचारणाही त्यांनी केली. मविआत मराठवाड्याची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्याचे निश्चित झाले होते, त्यामुळे काँग्रेसने आमच्या उमेदवाराला मदत करायला हवी होती, असे खैरे म्हणाले. तसेच, ठाकरे गटाने मदत केल्यामुळेच कल्याण काळे निवडून आले आहेत, याची आठवणही खैरे यांनी यावेळी करून दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, पण आदित्यसारखं नाव खराब करू नये; रामदास कदमांचा सल्ला
- सत्तेत असताना तुम्ही फेल, आम्हाला मतदानातून बदल हवाय; संदीप देशपांडेंचे भाजपला प्रत्युत्तर
- BAN vs ZIM Dream11 Prediction: बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे त्रिकोणी वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याची फँटसी टीम आणि खेळपट्टीचा अहवाल
Quick Answers
काँग्रेसने छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेसच्या या निर्णयानंतर चंद्रकांत खैरे यांनी जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
खैरे यांच्या म्हणण्यानुसार, महाविकास आघाडीत मराठवाड्याची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्याचे निश्चित झाले होते आणि त्यामुळे काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराला मदत करायला हवी होती.
राज्यात सध्या पुणे पदवीधर व शिक्षक, नागपूर शिक्षक, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर या पाच मतदारसंघांत निवडणूक सुरू आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








