🕒 1 min read
मुंबई: राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. ज्या ‘५० खोके’च्या घोषणांनी ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सळो की पळो करून सोडलं होतं, त्याच घोषणा आता चक्क भाजपचे कार्यकर्ते देऊ लागल्याने युतीत मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत एका वॉर्डमध्ये ‘मैत्रीपूर्ण लढती’त आता मैत्री बाजूला राहून थेट ‘दंगल’ सुरू झाल्याचे चित्र आहे.
मैत्रीपूर्ण लढतीत ‘काटाकाटी’
मुंबई महापालिका निवडणुकीचा (BMC Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. भाजपकडून शिल्पा केळुसकर तर शिवसेनेकडून पूजा कांबळे मैदानात आहेत. मात्र, प्रचारादरम्यान हे दोन्ही गट समोरासमोर आले आणि वातावरण चांगलंच तापलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी चक्क ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत शिवसेनेला डिवचलं. स्वतःच्याच मित्रपक्षाने ही घोषणा दिल्याने उपस्थितही अवाक झाले.
“१००० रुपये देऊन माणसं आणलीत…”
या राड्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. भाजप उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी आरोप केला की, “हे लोक खांद्याला खांदा लावून काम करत नव्हते, त्यांनी सोयीनुसार उडी मारली आहे.” तर त्यांचे पती दत्ता केळुसकर यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटलं, “त्यांच्या मागे असणारे लोक १ हजार रुपये रोजावर आणलेले आहेत. हिंमत असेल तर धनुष्यबाण घेऊन लढा, आमचं कमळ का वापरता?”
शिवसेनेचा पलटवार या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे (शिंदे गट) रामदास कांबळे यांनीही भाजपला आरसा दाखवला. ते म्हणाले, “हे लोक मतदारांची दिशाभूल करत आहेत. ज्यांनी पक्षाची फसवणूक केली, डुप्लिकेट फॉर्म बनवले आणि चोरी केली, त्यांच्यावर जास्त बोलणं उचित नाही.” ऐन निवडणुकीत युतीत पडलेला हा ‘मिठाचा खडा’ आता महायुतीला (Mahayuti) भारी पडणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “निवडणुकीत पडलात, तरी माज जाईना”; ठाकरेंनी दानवेंची ‘ती’ गोष्ट काढली, सभेत शिट्ट्यांचा पाऊस!
- ‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते…’; उद्धव ठाकरे भावूक, पण डोळ्यातील ‘त्या’ पाण्याचं सत्य काय?
- १५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










