🕒 1 min read
मुंबई – निवडणुकांचं वारं वाहू लागलं की कार्यकर्त्यांच्या अंगात संचारतं, हे आपण नेहमीच पाहतो. पण गोरेगावमध्ये हे ‘जोश’ जरा जास्तच टोकाला गेलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा (BMC Election 2026) धुराळा उडत असतानाच, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गोरेगाव पश्चिमेत प्रचाराच्या कारणावरून भाजप आणि मनसे कार्यकर्ते चक्क एकमेकांना भिडले आहेत. या हाणामारीत एक जण जखमी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
गोरेगाव पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ५८ मधील अमृत नगर भाग आज दुपारच्या सुमारास चांगलाच तापला. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप (BJP) आणि मनसे (MNS) या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते प्रचारासाठी जमले होते. अमृत नगर भागात प्रचाराचे टेबल लावण्यावरून दोन्ही गटांत आधी शाब्दिक चकमक झाली.
बघता बघता शब्दाला शब्द वाढत गेला आणि याचं रूपांतर तुफान राड्यात झालं. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हात उचलला. या धक्काबुक्की आणि हाणामारीत मनसेचा एक कार्यकर्ता जखमी झाल्याचं समजतंय. भररस्त्यात हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्येही काही काळ घबराटीचं वातावरण होतं.
घटनेचं गांभीर्य ओळखून गोरेगाव पोलिसांनी (Goregaon Clash) तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणावाचं वातावरण आहे. “नेमकी चूक कोणाची होती? कुणी कुणावर आधी हात उचलला?” याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याची शक्यता आहे.
एकिकडे राडा, दुसरीकडे ऐतिहासिक सभा
विशेष म्हणजे, गोरेगावात हा राडा सुरू असताना दुसरीकडे अवघ्या मुंबईचं लक्ष ‘शिवतीर्था’कडे (Shivaji Park) लागलंय. इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे बंधू (Thackeray Brothers) संयुक्त सभेसाठी एकाच मंचावर येत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या साक्षीने उद्धव आणि राज ठाकरे (Raj Thackeray) आज काय तोफ डागणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. मात्र, या ऐतिहासिक सभेच्या काही तास आधीच गोरेगावात झालेल्या भाजप-मनसे राड्याने निवडणुकीच्या वातावरणात चांगलीच उष्णता वाढवली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘खिशात पैसे नव्हते, घराचा हप्ता थकणार होता, पण…’; अमृता खानविलकरला आला स्वामींचा ‘हा’ थरारक अनुभव!
- “लाडक्या बहिणीं”चा हप्ता लटकणार?; तक्रारीनंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, तारखेबद्दल म्हणाले…
- “पदं काढून घ्या, गल्लीत कुणी गणपतीलाही…”; विलासरावांवर बोलणाऱ्या चव्हाणांवर राज ठाकरेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now









