Share

निवडणुका तोंडावर अन् शिंदे गटाची ‘ही’ फायरब्रँड नेत्या थेट बिग बॉसच्या घरात; एन्ट्रीने उडाली खळबळ!

बिग बॉस मराठी ६ च्या घरात शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांच्या एन्ट्रीने सर्वांनाच धक्का बसला आहे. राजकारण सोडून मनोरंजनाच्या मैदानात त्या कशा खेळणार?

Published On: 

Bigg Boss Marathi 6 Contestants: दीपाली सय्यद यांची एन्ट्री!

🕒 1 min read

मुंबई – राजकारणात आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे ‘अनपेक्षित धक्का’, आणि याचाच प्रत्यय प्रेक्षकांना काल रात्री आला. एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत, राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. अशातच शिंदे गटाच्या फायरब्रँड नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी थेट ‘बिग बॉस मराठी ६’ च्या (Bigg Boss Marathi 6) घरात एन्ट्री घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

भाऊच्या धक्क्यावर पार पडलेल्या ग्रँड प्रीमिअर सोहळ्यात दीपाली सय्यद यांनी ‘मला जाऊ दे’ या गाण्यावर थिरकत तोऱ्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांनी घरात जाण्यासाठी ‘शॉर्टकट’च्या दाराची निवड केली. ऐन निवडणुकीच्या काळात एका पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी 100 दिवसांसाठी अज्ञातवासात जाणं, हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आता त्या घरात राजकारण करणार की मनोरंजन, हे पाहणं रंजक ठरेल.

Deepali Sayyad in Bigg Boss Marathi 6

यंदाच्या पर्वात एकूण १७ स्पर्धक घरात कोंडले गेले आहेत. यात विनोदवीर सागर कारंडेपासून ते राकेश बापटपर्यंत अनेक दिग्गजांचा समावेश आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि राडा करणारे चेहरेही यात मागे नाहीत.

बिग बॉस मराठी ६ च्या १७ स्पर्धकांची नावे ही दीपाली सय्यद (राजकीय नेत्या/अभिनेत्री), सागर कारंडे (विनोदवीर), सचिन कुमावत, सोनाली राऊत, तन्वी कोलते, आयुष संजीव, करण सोनावणे, प्रभु शेळके उर्फ डॉन, प्राजक्ता शुक्रे (गायिका), रुचिता जामदार, अनुश्री माने, राकेश बापट (अभिनेता), रोशन भजनकर, दिव्या शिंदे, राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटीयन आहेत.

घरात एन्ट्री झाल्या झाल्या स्पर्धकांमध्ये गटबाजी सुरू झाली आहे का? दीपाली सय्यद यांच्या राजकीय प्रतिमेचा त्यांना फायदा होणार की तोटा? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण यंदाचा सीझन ‘राजकीय’ आणि ‘ग्लॅमरस’ असा दोन्ही असणार, हे नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)