🕒 1 min read
जालना: बदलापूरच्या त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता, हे अजून कोणीही विसरलेलं नाही. पण आता याच प्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापूर शाळेतील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारातील (Badlapur School Sexual Abuse) सहआरोपी तुषार आपटे (Tushar Apte) याला भाजपने चक्क स्वीकृत नगरसेवक बनवलंय! या निर्णयाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे.
“अत्याचाराचं बक्षीस मिळालं का?”
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत तुषार आपटेची वर्णी लागताच विरोधकांनी भाजपला धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दांत भाजपचा समाचार घेतला. “लैंगिक अत्याचाराबद्दल हे बक्षीस दिलंय का?” असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एका गंभीर गुन्ह्यातील सहआरोपीला थेट सत्तेच्या खुर्चीवर बसवल्याने भाजपची ‘चाल, चरित्र आणि चेहरा’ यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
बावनकुळे काय म्हणाले?
या वादावर आता भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यात पत्रकारांनी त्यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “ज्यांनी ज्यांनी चूक केली आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. निष्पक्षपणे कारवाई केली जाईल, चिंता करण्याची गरज नाही.” मात्र, नियुक्ती करण्यापूर्वी ही ‘चूक’ लक्षात का आली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
बावनकुळेंनी ओवैसींच्या “हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान होईल” या वक्तव्याचाही समाचार घेतला. “हे फक्त मतं मिळवण्यासाठी चाललंय, लोक त्यांना सोडून चाललेत,” असं बावनकुळे म्हणाले. तर, “भाजप कार्यकर्ते सतरंज्या उचलतात,” या जयंत पाटलांच्या टीकेला उत्तर देताना, “तुमचा पक्ष ९० टक्के रिकामी झालाय, आधी स्वतःचं घर सांभाळा, आमची पक्ष संघटना मजबूत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “तो मोठा नेता, त्याला मी ‘चिल्लर’ वाटतो..”; महेश लांडगेंच्या ‘त्या’ एकेरी उल्लेखावर अजितदादांचा सणसणीत टोला!
- मुंबईचा ‘चेहरा’ बदलण्याचा डाव? लोकसंख्येचं गणित अन् ‘ते’ धक्कादायक दावे; राजकीय वर्तुळात खळबळ!
- ‘आता किसिंग नको, चक्की पिसिंग करा’; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘तोफ’गोळा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










