🕒 1 min read
मुंबई – मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी काय वाट्टेल ते करायची तयारी नेत्यांनी दाखवली आहे, पण आता समोर आलेला फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीत बॉलीवूड आणि राजकारण यांचं नातं जुनं असलं तरी, आज वांद्रे बँडस्टँडवर जे घडलं, त्याने राजकीय निरीक्षकांनाही विचार करायला भाग पाडलंय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी थेट बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खानचे वडील आणि दिग्गज लेखक सलीम खान (Salim Khan) यांची भेट घेतली आहे!
सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असून सर्वांची नजर श्रीमंत मुंबई महापालिकेवर आहे. वांद्रे हा तसाही सेलिब्रिटींचा गड. याच भागात प्रचारासाठी फिरत असताना आशिष शेलार थेट सलीम खान यांच्या भेटीला पोहोचले. केवळ सदिच्छा भेट नव्हे, तर यावेळी शेलार यांनी सलीम खान यांना महायुतीच्या उमेदवाराला मत देण्याचं आवाहन केलं.
Ashish shelar meets salim khan
आशिष शेलार यांनी स्वतः या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ते सलीम खान यांच्याशी हसून संवाद साधताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय, “प्रचारादरम्यान प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांची भेट झाली आणि महायुतीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.”
खान कुटुंब आणि महायुतीचे नेते यांच्यातील जवळीक नवी नाही. याआधी एकनाथ शिंदेंनी गोळीबार प्रकरणानंतर सलमानची भेट घेतली होती, तर सलमाननेही गणपती बाप्पाच्या दर्शनाला शिंदेंच्या घरी हजेरी लावली होती. आता थेट वडिलांशीच भाजप नेत्याचा संवाद झाल्याने, खान परिवार उघडपणे महायुतीचा प्रचार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरी खान कुटुंबाकडून अजून अधिकृत पाठिंबा जाहीर झाला नसला, तरी या ‘एका भेटीने’ वांद्र्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे, हे मात्र नक्की!
दुसरीकडे, सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle of Galwan) या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे, जो १७ एप्रिल २०२६ ला प्रदर्शित होत आहे. पण सध्या तरी चर्चा आहे ती त्याच्या वडिलांच्या आणि आशिष शेलारांच्या ‘पॉलिटिकल मीटिंग’ची!
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते…’; उद्धव ठाकरे भावूक, पण डोळ्यातील ‘त्या’ पाण्याचं सत्य काय?
- १५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
- ‘ते’ सेक्स स्कँडल आणि मोदी…; डॉ. संग्राम पाटलांची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट समोर, रविकांत वरपेंचीही एन्ट्री!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










