🕒 1 min read
नागरिकांनी आपापल्या परिसरात अनधिकृत संस्थाद्वारे चालविल्या जाणाऱ्या बालगृह, अनाथाश्रम, वसतिगृहे ( hostels ) आदींची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर द्यावी,असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. अशा संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवून त्यांच्या शारिरीक मानसिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
अशा घटना बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण नियम २०१८ मधील तरतूदींचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.
बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ मधील कलम ४२ नुसार नोंदणी नसलेली संस्था, अथवा अशा संस्था चालविणाऱ्या व्यक्तिला १ लाखांपेक्षा अधिक दंड व १ वर्षे कारावास किंवा अशा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. तरी नागरिकांनी आपल्या परिसरातील अशा बेकायदेशीर संस्थांची माहिती कळवावी,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- संरक्षित खतसाठा पुरवठा कालमर्यादेचे पालन करावे- जिल्हाधिकारी
- अभिनेत्री Rajeshwari Kharat ने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; टीका करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना झाप झापलं
- विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत खोटे आरोप; निवडणूक आयोगाने फेटाळले Ranjeet Kasle यांचे दावे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












