🕒 1 min read
Ambadas Danve- राजकारणात शब्दांचे वार-पलटवार नेहमीच होतात, पण नेत्याची जीभ घसरली की मोठा वादंग निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडलाय, आणि यावेळी निशाण्यावर आहेत भाजपचे बडे नेते. अंबादास दानवे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे, पण त्यांचा ‘साटम-झाटम’ हा शब्दप्रयोग आता चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. अलीकडेच झालेले संवाद सत्र हे ‘टॉक शो’ नसून ‘फेक शो’ होते, असा दावा त्यांनी केला. “तिथे प्रश्न विचारणारेही त्यांचेच लोक होते,” असा आरोप करत दानवेंनी गुपचूप झालेल्या पंप हाऊसच्या उद्घाटनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
“फडणवीस आणि शिंदे यांनी मुंबईला लुटले असून महानगरपालिकेवर ३ लाख कोटींचे कर्ज आहे. ९३ हजार कोटींच्या ठेवीही तोडल्या आहेत,” असा धक्कादायक आरोप दानवेंनी केला. मुंबई फक्त ठाकरे बंधूंच्या हातातच सुरक्षित राहू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नितेश राणे आणि भाजपच्या इतर नेत्यांवर टीका करताना दानवेंचा तोल सुटलेला दिसला. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “नितेश राणे (Nitesh Rane), ही जी पिलावळ आहे… राणे, साटम, झाटम… (Amit Satam) यांनी विकासावर बोला.” भाजप नेत्यांची नावं वेडीवाकडी घेतल्याने आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.
इतकेच नाही तर, रावसाहेब दानवेंचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. “दोन आमदार मुलांचा बाप असणं ही विकासाची पावती होऊ शकत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. भाजपने वल्लभभाई पटेलांचे नाव पुसून मोदींचे नाव दिले, यावर उदय सामंत का बोलत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आता दानवेंच्या या ‘झाटम’ टीकेला भाजप कसं उत्तर देणार, हे पाहणं रंजक ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबईचं घर सोडून तेजश्री प्रधान ठाण्यात का गेली? फडणवीसांसमोर मांडली व्यथा; ‘ट्रॅफिक’वर मिळालं असं उत्तर!
- ‘पुष्पा’चा आवाज बिग बॉसच्या घरात घुमणार? मराठी इंडस्ट्रीतला ‘हा’ सुपरस्टार स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार?
- रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’साठी थेट मोदींना साकडं! आखाती देशांत असं काय घडलं? निर्माते हवालदिल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










