Share

शुभमन गिलचं टेन्शन वाढणार? जयस्वालला टीम इंडियात फिक्स होण्यासाठी दिग्गजाचा ‘हा’ गुरुमंत्र!

यशस्वी जयस्वालला टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जागा मिळवायची असेल, तर आयपीएल 2026 मध्ये 700 धावा कराव्या लागतील, असा सल्ला आकाश चोप्रा यांनी दिला आहे.

Published On: 

Yashasvi Jaiswal

🕒 1 min read

मुंबई – भारतीय क्रिकेटमध्ये सध्या जागा मिळवणं सोपं नाहीये, पण ती टिकवणं त्याहून कठीण झालंय, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. कसोटी क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या बॅटिंगने सध्या धुमाकूळ घातलाय, तो यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) अजूनही वनडे आणि टी-20 मध्ये आपली जागा पक्की करू शकलेला नाही. जेव्हा शुभमन गिल उपलब्ध नसतो, तेव्हाच त्याला संधी मिळते. पण आता हे चित्र बदलण्यासाठी एका माजी खेळाडूने यशस्वीला यशाचा कानमंत्र दिला आहे.

Aakash Chopra on Yashasvi Jaiswal IPL 2026

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी यशस्वीला टीम इंडियाचा ‘ऑल फॉरमॅट प्लेयर’ बनण्यासाठी एक कडक चॅलेंज दिलंय. चोप्रा यांच्या मते, जर यशस्वीला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचं असेल, तर त्याला आयपीएल 2026 मध्ये (IPL 2026) आपल्या बॅटची जादू दाखवावी लागेल. युट्यूब चॅनेलवर बोलताना चोप्रा म्हणाले, “यशस्वी, मला तुझ्याकडून 400-450 रन्सचा सीझन नकोय. मला तुझ्याकडून या आयपीएलमध्ये तब्बल 700 रन्स हवे आहेत. जेव्हा तू इतक्या धावा करशील, तेव्हा निवड समितीला तुझी दखल घ्यावीच लागेल.”

आकाश चोप्रा यांनी भारतीय संघातील ‘डेप्थ’ म्हणजेच खेळाडूंच्या गर्दीकडेही लक्ष वेधलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेत यशस्वी संघात असूनही बाकावर बसण्याची शक्यता आहे. कारण शुभमन गिल आणि रोहित शर्मा ओपनिंगला असताना यशस्वीला संधी मिळणं कठीण आहे.

आकाश चोप्रा यांनी एक मोठी भविष्यवाणी सुद्धा केली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर मात्र चित्र बदलेल. “वर्ल्ड कपनंतर यशस्वी जयस्वाल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा भारताचा नियमित खेळाडू बनेल,” असा विश्वास चोप्रा यांनी व्यक्त केला आहे. जुलै 2024 पासून यशस्वीने एकही टी-20 मॅच खेळलेली नाही, त्यामुळे आता आयपीएलची कामगिरीच त्याचं नशीब ठरवणार आहे, हे नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)