अजितदादांच्या राष्ट्रवादीत दोन गट? पक्षात नेमकं काय घडतंय?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याची चर्चा सुरू झाली असून, सुळे-पटेल यांच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Published On: 

NCP leaders Ajit Pawar Praful Patel internal split speculation

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिल्लीतील संसद भवन परिसरात प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यात सुमारे ३५ मिनिटे महत्त्वाची चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या सर्व वेगवान घडामोडींमुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत का, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पक्षात एका बाजूला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल आणि तटकरे असे दोन गट असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटांच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदारांना शरद पवारांचे फोन येतात का, अशी विचारणा सुनेत्रा पवार यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, शरद पवार रुग्णालयात दाखल असताना प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती, ज्या भेटीचीही मोठी चर्चा झाली.

याशिवाय पक्षात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नाराज असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. सुनील तटकरे यांना पक्षात डावलले जात असल्याची भावना मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर काही महत्त्वाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान तटकरे आणि पटेल यांनी पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली होती.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही