बीड, 11 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीड तालुक्यातील मनकर्णिका धरणावर झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित हे दोन्ही बडे नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
दुष्काळी उपाययोजनांचा भाग म्हणून राबवण्यात आलेल्या गाळपेरा कार्यक्रमादरम्यान हे दोन्ही लोकप्रतिनिधी एकत्र आले होते. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी पेरणी केली, तर आमदार विजयसिंह पंडित यांनी कासरा धरला. या कार्यक्रमस्थळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केली आणि त्यांच्यात गप्पाही रंगल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार रुग्णालयात असताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. याशिवाय, शरद पवार यांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका सुरू असून, पार्थ पवार यांनीही त्यांची दोनदा भेट घेतली आहे. या घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नसली तरी, अजित पवार असते तर १२ फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झाले असते, असा दावा तटकरे यांनी केला. दुसरीकडे, सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार या विलिनीकरणासाठी फार उत्सुक नसल्याचे समोर येत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्मा की जसप्रीत बुमराह? हार्दिक पांड्याच्या जागी कोण घेणार MI ची कमान, फ्रेंचायझीने दिले मोठे संकेत
- ५६ व्या वर्षी सैफ अली खानचे शर्टलेस सूर्यनमस्कार! पत्नी करीनाने सगळ्यांसमोरच दिले ओपन चॅलेंज
- राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








