प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’ला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून, घरोघरी रूफटॉप सोलर पॅनल बसवण्याच्या कामाला वेग आला आहे. सध्या दर सहा दिवसांत १ लाख सोलर सिस्टीम बसवण्यात येत असून, आगामी काळात ही गती आणखी वाढून दर ४ ते ५ दिवसांत १ लाख इन्स्टॉलेशन पूर्ण होतील, अशी माहिती केंद्रीय नवी आणि नूतनीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत नागरिकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि ७८,००० रुपयांपर्यंतची तगडी सबसिडी दिली जाते. हिवाळा सुरू झाल्याने घरात हीटर आणि गिझरसारख्या वीज खाणाऱ्या उपकरणांचा वापर वाढतो, ज्यामुळे सामान्य नागरिकांना वाढीव बिलाची चिंता सतावते. मात्र, ज्यांनी आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले आहेत, त्यांची वीज बिलाच्या त्रासातून पूर्णपणे मुक्तता झाली आहे.
नॅशनल पोर्टल फॉर रूफटॉप सोलरवरील ताज्या आकडेवारीनुसार, २ नोव्हेंबरपर्यंत या योजनेसाठी ८८.३ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत ५५.३ लाखांपेक्षा जास्त रूफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यात आल्या असून, या योजनेमुळे देशभरातील ६५.४ लाखांहून अधिक घरे प्रकाशमान झाली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली होती. ७५,००० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतून ३१ मार्च २०२७ पर्यंत देशातील १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर पॅनल बसवून ३०० युनिट मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या गतीनुसार सरकार आपले ठरवलेले लक्ष्य निश्चितपणे गाठेल, असा विश्वास मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सतेज पाटलांचे वडील स्कुटरवर फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू होतात का?; धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला
- विलीनीकरणाच्या चर्चेत मोठी घडामोड! अजित पवार गटाचे २० आमदार शरद पवारांच्या भेटीला?
- रत्नागिरीत गिफ्ट दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या बंबात पाणीच नसल्याने नागरिकांचा संताप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








