अशोक सराफांनी सांगितला नाना पाटेकरांचा किस्सा: “त्याच्या वाकड्यात गेलात तर…”

‘आदी अनंत’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीत अभिनेते अशोक सराफ यांनी नाना पाटेकरांच्या स्वभावाबद्दलचा एक जुना आणि रंजक किस्सा प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.

Published On: 

Ashok Saraf shares old anecdote about Nana Patekar

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदी अनंत’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या अशोक सराफ यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दलचा एक रंजक किस्सा सांगितला आहे.

एबीपी माझाला दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी नाना पाटेकरांच्या स्वभावाचे पैलू उलगडले. सराफ यांनी सांगितले की, नाना अनेकदा त्यांचे डोके, पाठ आणि हात दाबायचा तसेच मालिश करून द्यायचा. जेव्हा सराफ त्याला विचारायचे की ‘नाना हे काय?’, तेव्हा तो ‘तू तुझं काम कर’ असे उत्तर द्यायचा.

यावर सराफ यांनी त्याला बजावले होते की, हे काम असेच करायचे नाही, तर मेहनतीचा मोबदला म्हणून ते त्याला दोन रुपये देतील. सराफ यांनी सांगितले की, ते अनेकदा नानाला पाच रुपयेही द्यायचे. मात्र, एकदा एका कार्यक्रमात नानाने नेहमीप्रमाणे काम करायला सुरुवात केली, तेव्हा सराफ यांनी त्याला १० रुपये दिले.

दहा रुपये पाहिल्यानंतर नानाने लगेच विचारले, “आपले दोन रुपये ठरले होते, तू १० का दिलेस?” हा प्रसंग सांगताना अशोक सराफ पुढे म्हणाले की, यावरून नाना किती प्रामाणिक आणि सज्जन माणूस होता हे समजते. मात्र, जर कोणी त्याच्या वाकड्यात गेले, तर तो माणूस कामातूनच गेला असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही