प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीनंतर सतेज पाटील (Satej Patil) यांनी २०१९ मधील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, हे आम्हालाही माहीत आहे, असा थेट सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
कोल्हापूर दूध संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील यांची निवड झाली असून, या संघात आता महायुतीची सत्ता आली आहे. या निवडीनंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका स्पष्ट केली. तत्पूर्वी, महायुतीच्या एका सभेत चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर निशाणा साधला होता. ‘सोबतच्या लोकांना पायाखाली घेण्याचा बंटी पाटलांचा स्वभाव असून, त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक समज त्यांच्याकडे नाही,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना सतेज पाटील यांनी मिश्किल टोला लगावला. मुख्यमंत्रीपदाबद्दल ते जे बोलले, ते ऐकून बरं वाटल्याचे ते म्हणाले. तसेच, आपली अशी कोणतीही आकांक्षा नसून त्याबाबत आपल्याला कोणतीही चर्चा करायची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आपण नेहमी सर्वांना बरोबर घेऊनच काम केले असून, तोच आपला प्रयत्न असतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यानंतर सतेज पाटील यांनी थेट २०१९ च्या राजकीय घडामोडींवर बोट ठेवले. आपण जास्त बोललो तर विषय खूप पुढे जाईल. २०१९ नंतर देवेंद्र फडणवीसांना बाजूला सारून कोणाला मुख्यमंत्री व्हायचे होते, हे आम्हालाही माहीत आहे. राज्य आणि देशपातळीवरील विषय आपणही जाणतो, असे सूचक विधान सतेज पाटील यांनी यावेळी केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी मिळणार? हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर
- आयपीएल घोषणेपूर्वीच अर्शदीप सिंगच्या मुंबई इंडियन्स प्रवेशावर वडिलांचे शिक्कामोर्तब
- २०२८ पासून आयपीएलमध्ये १२ संघांचा समावेशाची शक्यता, पुणे आणि वडोदरा फ्रँचायझी शर्यतीत आघाडीवर
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








