प्रतिनिधी, ३० ऑक्टोबर: विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने योग्य समन्वय ठेवला असता, तर महायुतीला आणखी दोन जागा जिंकता आल्या असत्या, असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. या आरोपांवर राज्याचे मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. यासोबतच त्यांनी महायुतीतील समन्वय आणि संजय राऊत यांच्या टीकेवरही स्पष्ट भाष्य केले.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षापेक्षा उमेदवाराची प्रतिमा आणि त्याचा वैयक्तिक प्रभाव अधिक महत्त्वाचा असतो, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या जागेवरून शिवसेनेने बदला घेतल्याच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, आमचे २३७ आमदारांचे भक्कम सरकार आहे, त्यामुळे व्यक्तिगत किंवा राजकीय बदला घेण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. महायुतीमध्ये काही दुरावा निर्माण झाला असल्यास, तो दूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, ते अधिकार आपल्यासारख्या कार्यकर्त्यांकडे नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
महायुतीला आत्मचिंतनाची गरज असल्याचा सल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर गुलाबराव पाटलांनी जोरदार पलटवार केला. “संजय राऊत यांनी आधी स्वतःचे आत्मचिंतन करावे. त्यांच्याकडे अजून आत्मा शिल्लक आहे का, हे तपासावे आणि मगच चिंतनाच्या गोष्टी कराव्यात,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
जळगाव महापालिकेच्या कार्यक्रमांचे निमंत्रण लोकप्रतिनिधींना वेळेवर मिळत नसल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. सर्वांना दोन दिवस आधीच आमंत्रित केल्याचे सांगत, जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवक, महापौर, खासदार, आमदार आणि सर्वजण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या विरोधात काम केल्याच्या आरोपांवर त्यांनी बोलणे टाळले. याविषयी आपल्याला पुरेशी माहिती नसून स्थानिक नेतेच यावर अधिकृत भाष्य करू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी जळगाव जिल्हा बँक निवडणुकीबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले की, बँकेचा एनपीए (NPA) ५९ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे बँकेचे हित जपण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांनी आपापसात लढण्यापेक्षा एकत्र येऊन मार्ग काढणे गरजेचे आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघारीसाठी जवळपास १८ दिवसांची मुदत असते. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांना अर्ज भरण्यापासून रोखता येणार नाही. मात्र, अर्ज दाखल झाल्यावर महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र बसून जागावाटपावर नक्कीच तोडगा काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘फेकनाथमध्ये हिंमत असती तर…’ प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संताप
- प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ठाकरे गटाच्या आरोपानंतर मीनाक्षी शिंदे यांचा तडकाफडकी राजीनामा
- दिसेल तिथं ठोकणार! ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर रुपाली पाटील यांचा सुशील कुलकर्णींना भर चौकात बदडण्याचा इशारा
Quick Answers
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने योग्य समन्वय ठेवला असता, तर महायुतीला आणखी दोन जागा जिंकता आल्या असत्या, असा दावा भाजपने केला होता.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षापेक्षा उमेदवाराची प्रतिमा आणि त्याचा वैयक्तिक प्रभाव अधिक महत्त्वाचा असतो, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी आधी स्वतःचे आत्मचिंतन करावे, त्यांच्याकडे अजून आत्मा शिल्लक आहे का हे तपासावे आणि मगच चिंतनाच्या गोष्टी कराव्यात, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.
जळगाव जिल्हा बँकेचा एनपीए (NPA) ५९ टक्क्यांवर गेला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








