प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पावले उचलली आहेत. महायुतीतील परिस्थिती आणखी बिघडू नये, यासाठी शिंदे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना या क्लिप प्रकरणावर यापुढे काहीही न बोलण्याच्या तातडीच्या सूचना दिल्या आहेत.
तत्पूर्वी, रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. मराठा आंदोलन मॅनेज करण्याच्या जबाबदारीसाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना ५०० कोटी रुपये दिले आणि ते पैसे मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचले, अशी माहिती देणारी कथित ऑडिओ क्लिप सध्या देशात व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार भाजपकडूनच केला जात असल्याचा दावा कदम यांनी केला होता.
कदम यांच्या या आरोपांनंतर काल भाजपने आक्रमक पवित्रा घेत सलग पत्रकार परिषदा घेतल्या. रामदास कदम यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याचा आरोप करत, शिंदेंनी त्यांना समज द्यावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली. तसेच, भाजप नेते प्रसाद लाड यांनी थेट इशारा देत म्हटले होते की, आमच्याकडेही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाच्या क्लिप आहेत. तुम्ही आवरते घेतले नाही, तर आम्ही त्या उघड करून तुम्हाला तुमची जागा दाखवू.
दोन्ही पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापलेले असताना मंत्री उदय सामंत यांनी यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. अखेर भाजपने दिलेला सल्ला शिंदेंच्या शिवसेनेने मनावर घेतला असून, सूत्रांनुसार एकनाथ शिंदे यांनी कदम यांना या विषयावर बोलणे थांबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध शिंदे सेना हा संघर्ष आता संपण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनीही आज पत्रकार परिषद घेत एका नव्या गौप्यस्फोटाचा इशारा दिला आहे. आपल्याकडे आणखी एक ‘अणूबॉम्ब’ असून तोही आपण फोडणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नव्या माहितीतून कोणाबद्दल काय उघड होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
- या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
- ‘त्या छोट्या चुकांमुळे आम्हाला फटका बसला’; सलग दुसऱ्या पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरची खंत
Quick Answers
महायुतीतील परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना कथित क्लिप प्रकरणावर यापुढे काहीही न बोलण्याच्या तातडीच्या सूचना दिल्या आहेत.
मराठा आंदोलन मॅनेज करण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदेंना ५०० कोटी रुपये दिले आणि ते पैसे मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचले, अशी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात असून हा प्रकार भाजपकडूनच होत असल्याचा दावा कदम यांनी केला होता.
प्रसाद लाड यांनी इशारा दिला होता की, आमच्याकडेही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाच्या क्लिप आहेत; जर आवरते घेतले नाही तर त्या उघड करून जागा दाखवून देऊ.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याकडे आणखी एक 'अणूबॉम्ब' असून तोही आपण फोडणार असल्याचे स्पष्ट करत नव्या गौप्यस्फोटाचा इशारा दिला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








