मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून सुषमा अंधारेंचा घणाघात; ‘शिंदे-फडणवीस लक्षात ठेवा, कर्मा रिटर्न्स!’

मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सविस्तर पोस्ट लिहित भाजप नेत्यांवर आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

Published On: 

Sushma Andhare reacting to Manoj Jarange audio clip controversy

प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक सविस्तर सोशल मीडिया पोस्ट लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? शिंदे-फडणवीस तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कर्मा रिटर्न्स,’ असा थेट इशारा अंधारे यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे.

अंधारे यांनी स्पष्ट केले की, दोन दिवसांपूर्वी त्यांनी केवळ दीड मिनिटांचा ऑडिओ ऐकला होता, मात्र आता पूर्ण ३०-३२ मिनिटांची क्लिप ऐकल्यानंतर त्या बधिर झाल्या. अत्यंत भिकार मानसिकतेचा सुशील कुलकर्णी उदयनराजेंना मॅनिप्युलेट करण्याची भाषा करतो, हा त्याचा माज आहे की उदयनराजेंची अवहेलना, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर उदयनराजे किंवा त्यांचे समर्थक अजिबात व्यक्त होत नाहीत, यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आतापर्यंत मराठ्यांनी सुशील कुलकर्णीचा स्टुडिओ फोडून त्याला व्यवस्थित चोप दिला असेल, अशी अटकळ होती असेही त्या म्हणाल्या.

उद्धव ठाकरे यांच्यासारख्या शांत आणि सज्जन माणसाला बदनाम करण्यासाठी सुशील कुलकर्णी आणि अतुल भातखळकर यांच्यासारखी माणसं बेशरमपणे कसे कट रचतात, यावर अंधारे यांनी तीव्र चीड व्यक्त केली. ‘बाळासाहेब तुमचा बाप असेल, माझा बाप बापूसाहेब’ असे सांगणाऱ्या सुशील कुलकर्णीने सुरुवातीला असलेले स्वतःचे रेणापूरकर हे आडनाव बदलून फायदे मिळवण्यासाठी कुलकर्णी करून घेतल्याचा दावा त्यांनी केला. वाढवण बंदर किंवा इतर प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून त्यांना अमेरिका-चीनकडून निधी मिळत असल्याचा खोटा नरेटिव्ह वर्तमानपत्रांना मॅनिप्युलेट करून कसा पसरवता येईल, याचा आत्मविश्वास कुलकर्णी व्यक्त करत असल्याचे अंधारे म्हणाल्या. वर्तमानपत्रांनी स्वतःच्या विश्वासार्हतेसाठी याविरुद्ध खरंतर रान उठवायला हवे होते, असेही त्यांनी नमूद केले.

या ऑडिओ क्लिपमध्ये स्वतः अंधारे यांच्या नावाचाही उल्लेख आहे. आपल्याला मॅनिप्युलेट करणे शक्य नसल्याने चारित्र्यहनन करण्याचा रामबाण उपाय शोधला जात असल्याचे त्या म्हणाल्या. फसलेल्या करिअरची भळभळती जखम घेऊन टुकार पत्रकारितेच्या जीवावर भाजपचा पट्टा गळ्यात बांधलेला हा कुत्रा स्वतःला भाजप प्रवक्त्याचा गुरू म्हणवतो आणि भाजप प्रवक्ता पावाचा तुकडा खात हे मान्यही करतो, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

भाजपसाठी परसेप्शनवर काम करणारी श्वेता शालिनी हिने शिंदेंनी जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याचे बैठकीत सांगितले. हे ५०० कोटी भाजपकडून घेऊन दिल्याचे गंभीर भाष्य तिने केले आहे. पाचशे कोटी शिंदेंनी आणले की नाही, यावर शिंदेंच्या गोटातून अनेक जण खल करत असल्याचे अंधारे म्हणाल्या. फडणवीस आम्ही क्लिप तपासू असे म्हणतात, पण आम्ही पैसे दिलेच नाहीत असे स्पष्टपणे अजिबात सांगत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सुतराम संबंध नसताना जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवार किंवा ठाकरेंचे पाठबळ असल्याचा खोटा प्रचार वेगवेगळ्या यूट्यूब चॅनेलवरून पेरण्याची राजरोस रणनीती आखली गेल्याचे अंधारे यांनी सांगितले. सुशील कुलकर्णी, अतुल भातखळकर, श्वेता शालिनी आणि अतुल लिमये यांसारखे वर्णश्रेष्ठत्वाने पछाडलेले लोक मराठ्यांना स्वतःचा मेंदू वापरू शकत नाहीत असे समजून भ्रमित करत आहेत. जरांगे यांनी पैसे खाल्ले, त्यांच्या फार्महाऊसवर बाया असायच्या, असे आरोप करण्यासाठी मराठा समाजातीलच महिलांना तयार केले जात असल्याचे सांगत त्यांनी ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ आणि ‘पुष्यमित्र शृंगाची वृत्ती’ आजही संपली नसल्याचा उल्लेख केला.

सत्ताधारी क्षणात ही ऑडिओ क्लिप खोटी ठरवतील, मात्र यातले आवाज ओळखीचे आहेत आणि क्लिप खरी असल्याचे प्रत्येकाच्या लक्षात येत आहे, असे अंधारे म्हणाल्या. शिंदे-फडणवीस यांचे मुखवटे गळून पडून त्यांचे भेसूर चेहरे समोर आले असून लोकांनी आता तरी जागे व्हावे, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे, 'नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? शिंदे-फडणवीस तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कर्मा रिटर्न्स,' असा थेट इशारा दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही