CJP Protest: अभिजीत दिपकेंची सशर्त सुटका, मग आशुतोष रांका आणि सौरव दास कोठडीत का?

सीजेपीच्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी अटक झालेल्या अभिजीत दिपकेंना सशर्त जामीन मिळाला. पण आशुतोष रांका आणि सौरव दास अद्याप कोठडीत का आहेत, वाचा सविस्तर.

Published On: 

MHD LOGO

दिल्ली, 18 ऑक्टोबर: मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीनंतर आता कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. सीजेपीच्या दिल्लीतील 'लहरा दो तिरंगा' मार्चपूर्वी पोलिसांनी अभिजीत दिपके यांना अटक करून नंतर त्यांची सशर्त सुटका केली. मात्र, याच प्रकरणात त्यांचे सहकारी आशुतोष रांका आणि सौरव दास अद्याप तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत का आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 'लहरा दो तिरंगा' मार्च सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले होते. ते कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कपर्यंत पोहोचू शकले नाहीत. अटकेनंतर २४ तासांच्या आत त्यांना मंदिर मार्ग येथील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. शांतता भंग न करण्याच्या अटीवर आणि ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. तुरुंगातून बाहेर येताच दिपके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली.

दुसरीकडे, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावरील कारवाईचे स्वरूप वेगळे आहे. जंतरमंतरला आंदोलन स्थळांच्या यादीतून हटवले असतानाही, १० ऑक्टोबर रोजी या दोघांनी तिथे जाऊन तिरंगा फडकवला. यापूर्वी हमीपत्रावर सुटका होऊनही त्यांनी पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करत हे पाऊल उचलले. सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, अटींचे उल्लंघन केल्याने त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.

या दोन्ही कारवायांमधील कायदेशीर फरक भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलमांमध्ये दडलेला आहे. पोलिसांनी कलम १२६ आणि १७० अंतर्गत ही कारवाई केली आहे. कलम १७० नुसार गुन्हा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक अटकेचा अधिकार मिळतो, ज्याअंतर्गत दिपके यांना आंदोलनापूर्वीच रोखण्यात आले. तर कलम १२६ अंतर्गत दंडाधिकारी शांतता राखण्यासाठी हमीपत्राची मागणी करून सुटका करतात. मात्र, दास आणि रांका यांनी गुपचूप प्रतिबंधित जंतरमंतर गाठून नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि एसआयआर प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही