जळगाव, 17 ऑक्टोबर: अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एफडीएकडून धडक कारवाया सुरू असताना आस्थापनाधारकांकडून होत असलेल्या तक्रारींची दखल घेत त्यांनी हे विधान केले.
सध्या दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यभरात भेसळ आणि अनियमिततेविरोधात धाडसत्र सुरू आहे. यात दोषी आढळल्यास परवानेही निलंबित केले जात असल्याने दुकानदार आणि हॉटेलचालकांमध्ये मोठी धास्ती आहे. मात्र, काही अधिकारी आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन नियमबाह्य कारवाया करत असल्याची ओरड व्यापाऱ्यांकडून होत होती.
याबाबत झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई करण्याच्या धक्कादायक प्रकारात जे कोणी दोषी आढळतील, त्यांना निलंबित केले जाऊ शकते. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असून, तेच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. यात ५ ते ७ अधिकारी किंवा अन्य जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल.
दोन दिवसांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सुपाऱ्यांच्या ट्रकमधील कारवाईत भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर ५ अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून मोठा गदारोळ झाला होता. या घटनेची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत संबंधितांवर कारवाई सुरू केल्याची माहिती आहे.
दरम्यान, एफडीएने १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी कोकण आणि पुणे विभागात विशेष शोधमोहीम राबवली. या मोहिमेत मुदतबाह्य आणि खराब झालेले अन्न विल्हेवाटीच्या नावाखाली पुन्हा खुल्या बाजारात विकणाऱ्या साखळीचा पर्दाफाश करण्यात आला.
या दोन दिवसांच्या कारवाईत तब्बल ४८ लाख ८ हजार ९२४ रुपयांचा खराब आणि संशयास्पद अन्नसाठा उघडकीस आला. तसेच, भिवंडी, अंबरनाथ आणि खेडमधील (चाकण-निघोजे) मोठ्या कंपन्यांच्या ५ गोदामांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या दोन आस्थापनांना आपला व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- AUS vs NZ 1st T20I Dream11 Prediction: ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्याची ड्रीम ११ टीम, खेळपट्टीचा अहवाल आणि संभाव्य प्लेइंग ११
- गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांनी दोन चॉकलेट देत दिला मोलाचा सल्ला
- भाजपच्या मेळाव्यात शिवसेना तर शिवसेनेच्या मेळाव्यात भाजप आमदाराची पाठ, राजकारण तापलं
Quick Answers
कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा सज्जड दम मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.
मालेगाव येथे सुपाऱ्यांच्या ट्रकमधील कारवाईत भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले होते, त्यानंतर ५ अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून मोठा गदारोळ झाला होता.
या दोन दिवसांच्या कारवाईत तब्बल ४८ लाख ८ हजार ९२४ रुपयांचा खराब आणि संशयास्पद अन्नसाठा उघडकीस आला आहे.
भिवंडी, अंबरनाथ आणि खेडमधील (चाकण-निघोजे) मोठ्या कंपन्यांच्या ५ गोदामांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







