सोलापूर, 17 ऑक्टोबर: पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय घडामोडींवरून सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'मजबुरी का नाम मंगेश चिवटे' असा टोला लगावत, उद्या जर उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाली, तर 'एकनाथ शिंदे २.०' असलेले उदय सामंत हे नक्कीच भाजपसोबत जातील, असा मोठा दावा अंधारे यांनी केला आहे.
राज्यामध्ये सध्या विधानपरिषदेच्या ५ मतदारसंघांची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, सर्वांचे लक्ष पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकडे लागले आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, सचिन सावंत यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडींदरम्यान शिंदेंच्या शिवसेनेने त्यांचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांना अर्ज मागे घेण्यास सांगून, सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने भाजपची अडचण वाढली आहे.
मंगेश चिवटे यांना माघार घ्यायला लागल्यामुळे त्यांच्यावर नामुष्की ओढवल्याचे चित्र आहे. याच मुद्द्यावरून टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सचिन सानप हे एकनाथ शिंदे यांचे नसून उदय सामंत यांचे माणूस आहेत. मंगेश चिवटे हे शिंदेंचे उमेदवार होते, मात्र या सगळ्या राजकारणात चिवटेंचा बळी दिला गेला. त्यामुळेच ही अवस्था 'मजबुरी का नाम मंगेश चिवटे' अशी झाल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.
या मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर हे रिंगणात आहेत. तसेच, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनीही अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला असून, त्यांना अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने त्यांचेही पारडे जड मानले जात आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी यावेळी निवडणूक आयुक्तांवरही जोरदार हल्लाबोल केला. 'ज्ञानू का जानू कौन है इधर?' असा सवाल करत त्यांनी ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य केले. धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी जेवढी माणसे आली नाहीत, तेवढी ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी आली, असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे साटेलोटे असल्याचे सुचवले.
तसेच राम सातपुते, राणा बाई आणि कोकणातला भाचा टिल्लू हे विद्वान लोक असल्याची उपहासात्मक टीका त्यांनी केली. आंदोलनामध्ये आम्ही तिरंगा घेऊन जायचे नाही, तर काय भाजपचे कमळ घेऊन जायचे का? असा सवाल करत तिरंगा हीच आमची अस्मिता असल्याचे सुषमा अंधारे यांनी ठणकावून सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानी खेळाडूंना हवाय ‘क’ श्रेणीचा करार; PCB च्या नव्या बदलांमुळे NOC ची गरज संपुष्टात येणार
- भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; मंगळवेढ्यात ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकारी फोडले
- पुणे शिक्षक निवडणूक : ‘कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटणार नाही’, मंगेश चिवटेंचा मोठा दावा
Quick Answers
उद्या जर उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाली, तर 'एकनाथ शिंदे २.०' असलेले उदय सामंत हे नक्कीच भाजपसोबत जातील, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर रिंगणात आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेने त्यांचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांना अर्ज मागे घेण्यास सांगून सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे.
सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, सचिन सानप हे उदय सामंत यांचे माणूस असून या सगळ्या राजकारणात शिंदेंचे उमेदवार असलेल्या मंगेश चिवटे यांचा बळी दिला गेला, त्यामुळे ही अवस्था झाली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






