शिक्षकांना धमकावल्यास थेट SIT चौकशी! बावनकुळेंचा कडक इशारा; दर्यापुरात सदावर्तेंविरोधात जोडेमार आंदोलन

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना धमकावणाऱ्या संस्था आणि व्यक्तींची थेट एसआयटी चौकशी केली जाईल, असा स्पष्ट इशारा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

Published On: 

MHD LOGO

अमरावती, 17 ऑक्टोबर: अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना धमकावण्याचे प्रकार समोर येत आहेत. यावर राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. 'शिक्षकांना धमकावणारी संस्था आणि ती व्यक्ती कितीही मोठी असली, तरी त्यांना सोडले जाणार नाही, त्या संस्थेची थेट एसआयटी (SIT) चौकशी केली जाईल,' असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.

शुक्रवारी अमरावती येथील सांस्कृतिक भवनात महायुतीचे शिवसेना उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ 'विजय संकल्प मेळावा' आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना बावनकुळे यांनी कुणाचेही नाव न घेता हा इशारा दिला. शिक्षकांना धमक्या येत असतील तर त्यांनी थेट आपल्याकडे तक्रार करावी, त्या तक्रारीची निश्चित आणि योग्य दखल घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याच मंचावर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही महत्त्वाची टिप्पणी केली. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्याकडून संवादात काही अडचण आली असेल तर त्यासाठी आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले. 'मंचावर बसलेल्या प्रत्येकाच्या मनात काय आहे हे सांगता येत नाही, पण नार्कोटेस्ट झाली तर प्रत्येकाच्या मनात महायुतीच्याच उमेदवाराचे नाव असले पाहिजे,' अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. आजचा दिवस महायुतीचा धर्म पाळण्याची शपथ घेण्याचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मंचावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके आणि आमदार रवी राणा यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील महायुतीचे आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी पत्रकार परिषदेत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल गुणरत्न (गुणवंत) सदावर्ते यांच्याविरोधात शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक झाला आहे. माजी जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी एका गाढवावर सदावर्ते यांच्या फोटोचा फलक लावून त्याला जोडे आणि चपला मारत आपला संताप व्यक्त केला. 'एकनाथ शिंदे यांच्याबद्दल पुन्हा अपशब्द वापरल्यास थेट घरात घुसून मारू,' असा आक्रमक इशारा यावेळी अरबट यांनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

शिक्षकांना धमकावणारी संस्था आणि ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्यांना सोडले जाणार नाही, आणि त्या संस्थेची थेट एसआयटी (SIT) चौकशी केली जाईल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही