दिल्ली, 17 ऑक्टोबर: दिल्लीमध्ये तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आणि ऑल इंडिया स्टुडेंट्स असोसिएशनच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून दिपके यांची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही, तर नेहा बोरा यांना मध्यरात्री वकिलांना भेटण्याची परवानगी मिळाली.
'आयसा'ने दिलेल्या माहितीनुसार, नेहा बोरा यांना सुमारे पाच तास एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात फिरवण्यात आले. अनेक तासांच्या खटाटोपानंतर मध्यरात्री आरके पुरम पोलीस ठाण्यात वकिलांना त्यांची भेट घेता आली. त्यांची प्रकृती खालावलेली असतानाही पोलिसांनी त्यांना औषधे देऊ दिली नाहीत. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, 'एका महिला नेत्याला पोलीस अशी वागणूक कशी देऊ शकतात?' आणि 'त्यांची सुटका कधी होणार?' असे प्रश्न विद्यार्थी संघटनेने 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारले आहेत. पोलिसांनी त्यांच्या सुटकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दुसरीकडे, शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेले अभिजीत दिपके अद्याप अज्ञात स्थळी असल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. वकील त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. सीजेपीचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी 'एएनआय'ला (ANI) दिलेल्या माहितीनुसार, दिपके यांना ताब्यात घेऊन आठ तासांपेक्षा जास्त वेळ लोटला आहे. मात्र, त्यांना वकिलांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलू दिले जात नाहीये. संसदेच्या पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, दिपके तिथे नसल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना ज्या भागातून ताब्यात घेतले, तेथील पोलीस ठाण्यात विचारणा करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. त्यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तरुणांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचा संताप सीजेपीने व्यक्त केला आहे. 'आम्ही भारताचे नागरिक असून आम्हाला घटनात्मक अधिकार व संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. तिरंगा घेऊन बाहेर पडणे गुन्हा आहे का?' असा सवाल करत सीजेपीने पोलिसांना उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
तसेच, सीजेपीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत स्पष्ट केले आहे की, 'तुम्ही एका अभिजीतला ताब्यात घ्याल, तर हजारो अभिजीत तयार होतील. तुम्ही एका सौरव किंवा आशुतोषला तुरुंगात डांबाल, तर हजारो सौरव रस्त्यावर उतरतील आणि हजारो आशुतोष दिल्लीत पोहोचतील. तिरंगा आमचा प्राण आणि शान असून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही,' असा ठाम इशारा संघटनेने दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल; छातीच्या संसर्गावर उपचार सुरू
- IND vs WI 5th T20I: पाचव्या सामन्यासाठी ड्रीम 11 प्रेडिक्शन, खेळपट्टीचा अहवाल आणि संभाव्य संघ
- आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यात पुण्यात राडा; पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल
Quick Answers
दिल्लीत तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आणि ऑल इंडिया स्टुडेंट्स असोसिएशनच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांना ताब्यात घेतले आहे.
'आयसा'ने दिलेल्या माहितीनुसार, नेहा बोरा यांना सुमारे पाच तास एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात फिरवण्यात आले आणि प्रकृती खालावलेली असतानाही पोलिसांनी त्यांना औषधे दिली नाहीत. मध्यरात्री आरके पुरम पोलीस ठाण्यात वकिलांना त्यांची भेट घेता आली.
अजिंक्य शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांना ताब्यात घेऊन आठ तासांपेक्षा जास्त वेळ झाला असला तरी त्यांना वकिलांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलू दिले जात नाहीये आणि संसदेच्या पोलीस ठाण्यात चौकशी केली असता ते तिथे नसल्याचे सांगण्यात आले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






