तिरंगा रॅलीला सुरुवात होण्यापूर्वीच अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; सेंट्रल पार्कमध्ये समर्थकांची गर्दी

सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ आयोजित ‘लेहरा दो तिरंगा रॅली’ सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी आयोजक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले.

Published On: 

MHD LOGO

दिल्ली, 16 ऑक्टोबर: दिल्ली पोलिसांनी 'लेहरा दो तिरंगा रॅली'ला सुरुवात होण्यापूर्वीच आयोजक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे. रॅलीचे नेतृत्व करणारा प्रमुख चेहराच पोलिसांच्या ताब्यात गेल्यामुळे आता या आंदोलनाचे पुढे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी सीजेपीचे (CJP) समर्थक सेंट्रल पार्कमध्ये मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, तिरंगा फडकवण्यासाठी केवळ ११ जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. सध्या कोणताही मोठा नेता आंदोलनस्थळी पोहोचलेला नाही.

ताब्यात घेताना दिपके यांनी 'माझा गुन्हा काय?' असा सवाल पोलिसांना विचारला. त्यावर, 'आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही, तरीही तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करत असल्यामुळे ताब्यात घेत आहोत,' असे पोलिसांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी, आज दुपारपासूनच पोलिसांनी अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा सुरू केली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का किंवा त्यांना अटक केली जाणार का, याविषयी आधीपासूनच शक्यता वर्तवली जात होती.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

दिल्ली पोलिसांनी रॅली सुरू होण्यापूर्वीच तिचे आयोजक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही