लातूर, 16 ऑक्टोबर: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आता एका नव्या राजकीय घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काँग्रेसच्या विरोधात महायुती निवडणुकीच्या मैदानात उतरेल अशी चर्चा असतानाच, राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार धीरज देशमुख एकाच गाडीतून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या दोन्ही नेत्यांनी एकत्र हजेरी लावली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू अविनाश बाळासाहेब जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विरोधी पक्षांतील हे दोन नेते एकाच वाहनातून आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
या अनपेक्षित घडामोडीवर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सहकार क्षेत्रातील निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत, असे ते म्हणाले. तसेच, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही यापूर्वीही एकत्र होतो आणि आताही एकत्र आहोत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी काल लातूरमध्ये या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले होते. राज्यात एकत्र असलेली महायुती जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही एकत्र येईल का, याबाबत चर्चा केली जाईल असे तटकरे म्हणाले होते. मात्र, आजच्या या घडामोडींनंतर लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेमकी कोणती नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs WI 5th T20I: बंगळूरमध्ये रंगणार निर्णायक सामना; संभाव्य प्लेइंग ११ आणि हवामानाचा अंदाज
- देशात अराजकता पसरवण्याचं काम करु नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल
- ‘ही लढाई केवळ खुर्चीसाठी नाही’, सांगली जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज सुप्रीम कोर्टात वैध ठरल्यानंतर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






