प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येसाठी पप्या शिंदेने चप्पलेऐवजी बूट का घातले? पोलीस तपासात मोठं कारण उघड

मारेकऱ्यांना कार्यालयात घुसता यावे आणि दरवाजा उघडा ठेवता यावा, यासाठी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पप्या शिंदेने मुद्दाम बूट घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Published On: 

MHD LOGO

ठाणे, 16 ऑक्टोबर: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या तपासात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. २९ सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगरमधील कार्यालयात पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली होती. या कटातील मुख्य सूत्रधार आणि पूर्णेकरांचा जुना मित्र पप्या शिंदे याने हत्येच्या दिवशी मुद्दाम चप्पलेऐवजी बूट का घातले होते, याचे धक्कादायक कारण आता पोलीस चौकशीत समोर आले आहे. नेहमी चप्पल घालणारा पप्या त्या दिवशी मात्र बूट घालून पूर्णेकरांच्या कार्यालयात आला होता.

हत्येच्या दिवशी पूर्णेकर यांचे कार्यकर्ते नवरात्रौत्सवाची वर्गणी गोळा करण्यासाठी बाहेर गेले होते. मारेकरी याच संधीची वाट पाहत होते. पप्या शिंदे बूट न काढताच कार्यालयात पूर्णेकरांसोबत बसून राहिला. मारेकरी आत शिरल्यावर पूर्णेकरांना दरवाजा बंद करता येऊ नये, यासाठी पप्याने आपला बुटासह पाय दरवाजाच्या मध्ये ठेवून तो उघडा राहील याची काळजी घेतली. त्याने इशारा करताच संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि नितेश पवार ऊर्फ भावड्या यांनी आत घुसून पूर्णेकरांवर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर अमित जयकिशन सिंग ऊर्फ पपलू आणि निखिल यादव या दोघांनी चॉपरने सपासप वार करत पूर्णेकरांची हत्या केली.

हत्येच्या आदल्या दिवशी पप्या शिंदे चप्पल घालूनच कार्यालयात आला होता. त्याने केबिनबाहेर काढलेली चप्पल पूर्णेकरांच्या एका कार्यकर्त्याने लघुशंकेला जाताना घातली होती. या साध्या कारणावरून पप्या त्या कार्यकर्त्यावर चांगलाच भडकला होता. दुसऱ्या दिवशी मात्र हत्येचा कट पूर्णत्वास नेण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक बुटांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. निवडणुकीतील वादानंतर पप्या शिंदेने गणपतीपासून पुन्हा पूर्णेकरांशी बोलण्यास सुरुवात केली होती. या जवळीकीचा फायदा घेत त्याने मारेकऱ्यांना कार्यालयात घुसवले.

गुन्ह्यानंतर संतोष आणि नितेश हे पप्याच्याच दुचाकीवरून पळून गेले. त्यांच्या पळण्याची सोय म्हणून पप्याने काही अंतरावर एका अल्टो गाडीचीही व्यवस्था करून ठेवली होती, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. विशेष म्हणजे, पूर्णेकरांच्या हत्येनंतर पप्यानेच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात रुग्णालयात नेले होते. मात्र, तिथे पोलिसांना त्याच्या हालचालींवर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. सध्या गुन्हे शाखा पप्या शिंदेसह पाचही आरोपींची कसून चौकशी करत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

२९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगरमधील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली होती.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही