प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेत कोर्टाने स्पष्टीकरण मागितल्यानंतर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर सपशेल माफी मागितली आहे.
आपण आपल्या आयुष्यात कधीही न्यायालयाचा अवमान केलेला नाही, असे सांगत राऊत यांनी आपली बाजू मांडली. आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी पाहिल्यावर मन अस्वस्थ होते आणि चीड येते. केवळ मलाच नव्हे, तर देशातील लाखो लोकांच्या मनात ही चीड असल्याचे ते म्हणाले.
याच रागाच्या भरात एखादा शब्द इकडे-तिकडे गेला असेल, मात्र न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला कधीच हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, रागातून असा एखादा शब्द तोंडून गेला असेल तर आपण सर्वोच्च न्यायालयाची एकदा नाही, तर दहा वेळा माफी मागतो, अशी स्पष्ट कबुली संजय राऊत यांनी दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला टी-२०: रायपूरमध्ये महिला प्रेक्षकांसाठी मोफत प्रवेश
- घटस्फोटानंतर युझवेंद्र चहलचा मोठा खुलासा; पॅनिक अटॅक आणि २६ दिवस रिहॅबमध्ये गेल्याची माहिती
- भाजपप्रमाणे शिवसेनेनेही कारवाई करावी; बहिणीच्या बंडखोरीवरून खासदार अनिल बोंडे संतापले
Quick Answers
सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेत कोर्टाने स्पष्टीकरण मागितल्यानंतर संजय राऊत यांनी माफी मागितली.
आपण आयुष्यात कधीही न्यायालयाचा अवमान केलेला नाही आणि न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला कधीच हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.
रागाच्या भरात एखादा शब्द तोंडून गेला असेल तर आपण सर्वोच्च न्यायालयाची एकदा नाही, तर दहा वेळा माफी मागतो, अशी स्पष्ट कबुली संजय राऊत यांनी दिली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







