अमरावती, 16 ऑक्टोबर: विधान परिषद निवडणुकीतील (२०२६) अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर भाजपचे बंडखोर दिलीप कडू यांनी आव्हान उभे केले आहे. मित्रपक्षांमधील समन्वयाच्या अभावामुळे ताणले गेलेले हे संबंध आणि बंडखोरीचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. ही डोकेदुखी सोडवण्यासाठी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत आज तातडीने अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत.
अमरावतीमधील या बंडखोरीचे पडसाद पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही उमटताना दिसत आहेत, ज्यामुळे तिन्ही पक्ष एकमेकांना चेकमेट देण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. अमरावतीत भाजपचा बंडखोर उभा असल्याने पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देणार आहे. तसेच, अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला मदत केल्यास, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादीला मदत करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बावनकुळे आणि सामंत यांच्या शिष्टाईने अमरावतीतील वाद मिटला, तर शिवसेना पुण्याच्या भूमिकेवर पुनर्विचार करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अमरावतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांमुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. दिलीप कडू यांच्याव्यतिरिक्त भाजपचे शेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांनी, तर शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही बंडखोरी केली आहे. यापूर्वी नागपूरमध्ये 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस' यांनी भाजपचे बंडखोर अनिल सोले यांची नाराजी दूर केली होती. त्यामुळे आता तोच 'नागपूर फॉर्म्युला' अमरावतीतही वापरला जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आज अमरावतीत महायुतीची महत्त्वाची आणि वादळी ठरू शकणारी बैठक पार पडणार असून, त्यानंतर नेतेमंडळी स्वतः बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढणार आहेत.
या घडामोडींनंतर अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार' हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, उद्योगमंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आमदार बच्चू कडू हे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
दुसरीकडे, एका बाजूला 'मुख्यमंत्र्यांनी' महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे म्हटले आहे. मात्र 'पुणे शिक्षक' मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या विरोधातील बंडखोराला पाठिंबा जाहीर करून वेगळी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया: स्कॉट बोलंडचा संघात पुनरागमनासाठी दावा, कागिसो रबाडाच्या फिटनेसवर लक्ष
- शिक्षक-पदवीधर निवडणूक: अमरावतीतील बंडखोरीवरून महायुतीत कुरघोड्या, शिवसेना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
- AUS-L vs WI-L 2nd Semi-final: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२६; जाणून घ्या ड्रीम ११ टिप्स आणि संभाव्य प्लेइंग ११
Quick Answers
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर भाजपचे बंडखोर दिलीप कडू यांनी आव्हान उभे केले आहे.
भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत.
अमरावतीत भाजपचा बंडखोर उभा असल्याने पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






