सरन्यायाधीशांवरील टिप्पणी भोवली; संजय राऊत आणि निखिल वागळेंविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल

सरन्यायाधीशांवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी संजय राऊत आणि निखिल वागळे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि पत्रकार निखिल वागळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (SCBA) या दोघांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात फौजदारी अवमान खटला सुरू करण्यासाठी १९७१ च्या न्यायालय अवमान कायद्यातील कलम १५ नुसार अॅटर्नी जनरल किंवा सॉलिसिटर जनरल यांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. त्यानुसार, असोसिएशनने अॅटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांच्याकडे संमती मागितली होती. या पत्राची दखल घेत त्यांनी खटला चालवण्यास होकार दिला आहे. राऊत आणि वागळे यांचे ट्विट्स प्रथमदर्शनी सर्वोच्च न्यायालय आणि विशेषतः सरन्यायाधीशांची प्रतिष्ठा मलीन करण्याच्या उद्देशाने केल्याचे व्यंकटरमणी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींसह इतर विरोधी पक्षनेत्यांना सरन्यायाधीशांनी भेटण्याची वेळ नाकारली होती. यानंतर वागळे आणि राऊत यांनी वादग्रस्त ट्विट्स केले. वागळे यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी 'न्यायाधीश भाजप नेत्यांच्या पार्ट्यांना हजेरी लावतात आणि त्यांच्यासोबत बॅडमिंटन खेळतात,' अशी टिप्पणी केली होती.

संजय राऊत यांचे हे दावे तथ्यांवर आधारित नसल्याचे महाधिवक्त्यांनी मान्य केले आहे. एका न्यायाधीशाच्या जुन्या छायाचित्राचा विपर्यास करून ही विधाने करण्यात आली होती. विशेष म्हणजे, दिल्ली उच्च न्यायालयाने ते छायाचित्र हटवण्याचे आदेश आधीच दिले आहेत. त्यामुळे त्याच छायाचित्राचा आधार घेऊन न्यायव्यवस्थेला वादात ओढण्याचा हा प्रयत्न असल्याचे वरवर पाहता दिसत आहे.

दरम्यान, ॲटर्नी जनरल यांनी खटल्याला मंजुरी दिली याचा अर्थ हे दोघेही दोषी आहेत असा होत नाही. यापुढील कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. दुसरीकडे, एका वकिलाकडून कायदेशीर नोटीस आल्यानंतर निखिल वागळे यांनी माफी मागत आपल्या सोशल मीडिया पोस्ट हटवल्या आहेत. मात्र, या याचिकेमुळे राऊत आणि वागळे यांच्यासमोरील कायदेशीर पेच वाढला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (SCBA) या दोघांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही