अस्वच्छता आणि खराब अन्नावरून FDA ची मुंबईत धडक कारवाई; १७ हॉटेल्ससह डॉमिनोजला दणका

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबईत मोठी कारवाई; अस्वच्छता आणि नियमभंगाप्रकरणी १७ हॉटेल्स, डॉमिनोज आणि ३ रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 15 ऑक्टोबर: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबईसह राज्यभरात धडक कारवाया सुरू आहेत. नुकतीच मुंबईतील १७ हॉटेल्सवर एफडीएने कारवाई केली असून, खराब अन्न आणि अस्वच्छतेच्या कारणावरून या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

या कारवाईत धारावी येथील प्रसिद्ध 'तेरेसा हॉटेल'मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने त्यांचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणी हॉटेल चालकाकडे विचारपूस केली असता त्याने बोलण्यास नकार दिला. तसेच, 'ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड'च्या डॉमिनोज पिझ्झाच्या परळ, बोरीवली आणि अंधेरी पूर्व येथील तीन प्रमुख शाखांवरही कारवाई करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान पिझ्झा बनवण्याच्या आणि साठवणुकीच्या जागी मोठी अस्वच्छता, फ्रीजमधील घाण, खराब अन्न आणि वारंवार वापरलेले तेल अशा ग्राहकांच्या आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे या तिन्ही शाखांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

हॉटेल्ससह रक्तकेंद्रांवरही एफडीएने मोठी कारवाई केली आहे. ऐच्छिक रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदात्यांना 'टायटन' घड्याळे भेट दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मुंबईतील तीन रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या (NBTC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार रक्तदान शिबिरात अशा प्रकारच्या भेटवस्तू देऊन प्रलोभन दाखवण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणीअंती ही कारवाई करण्यात आली.

यात इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या रक्तकेंद्राचा परवाना ५ दिवसांसाठी, तर जे. जे. रुग्णालय आणि बी. वाय. एल. नायर रुग्णालयाच्या रक्तकेंद्रांचे परवाने प्रत्येकी ३ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. मात्र, जे. जे. आणि नायर रुग्णालयाने शासनाकडे दाद मागितल्याने त्यांच्या निलंबन आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. 'रक्तदान ही मानवतेची सेवा असून रक्तदात्यांना कोणत्याही प्रलोभनातून रक्तदानासाठी प्रवृत्त करू नये,' अशी स्पष्ट भूमिका एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मुंबईतील १७ हॉटेल्सवर खराब अन्न आणि अस्वच्छतेच्या कारणावरून एफडीएने कारवाई केली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही