Share

आयफोन भेट, लग्नासाठी ब्लॅकमेलिंग अन् बदनामीची धमकी; मानसिक त्रासाला कंटाळून संभाजीनगरमध्ये तरुणीची आत्महत्या

आयफोन गिफ्ट देऊन तरुणीला लग्नासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरमध्ये तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल.

Published On: 

Chhatrapati Sambhajinagar girl suicide case over blackmail

छत्रपती संभाजीनगर, 12 ऑक्टोबर: आयफोन भेट देऊन तरुणीशी जवळीक साधणाऱ्या एका तरुणाने तिला लग्नासाठी ब्लॅकमेल (Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्यास बदनामी करण्याची धमकी आरोपी देत होता. याच मानसिक दबावातून तरुणीने गळफास घेत स्वतःचे जीवन संपवले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला आहे.

मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश शंकर शेंडगे (मूळ रा. बरडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली आणि सध्या रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेशने त्यांच्या मुलीला आयफोन घेऊन दिला होता. यानंतर त्याने ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझी बदनामी करेन आणि इतर कुठेही लग्न होऊ देणार नाही’, अशी धमकी देत तिला वारंवार मानसिक त्रास दिला. या त्रासामुळेच मुलगी नैराश्यात गेली आणि तिने आत्महत्येचे पाऊल उचलले, असा आरोप वडिलांनी केला आहे.

१४ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६.३० च्या दरम्यान जोगेश्वरीच्या गणेशनगर भागात ही घटना घडली. तरुणीचे वडील हनवंता शेषराव सिरामे (वय ४२) आणि त्यांची पत्नी कामानंतर घरी परतले, तेव्हा घराला बाहेरून कडी लावलेली होती. कडी उघडून घरात प्रवेश करताच त्यांना मुलीने गळफास घेतल्याचे दिसले. तिला तत्काळ उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर कुटुंबीयांनी मुलीच्या मोबाईल आणि इतर वस्तूंची पाहणी केली असता, तिच्याकडचा आयफोन गणेश शेंडगेनेच दिल्याचे समोर आले. वडिलांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०८ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही