Share

विधान परिषद निवडणूक: शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात बंड, भाजपच्या तीन नेत्यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी

अमरावती शिक्षक मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार या तीन नेत्यांना भाजपने ६ वर्षांसाठी निष्कासित केले आहे.

Published On: 

Nagpur MLC Election Anil Sole rebellion against BJP candidate Sudhakar Kohale

अमरावती, 11 ऑक्टोबर: राज्यात सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने बंडखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिंदे गटाच्या नेत्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.

चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार अशी कारवाई झालेल्या नेत्यांची नावे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही या तिघांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रताप अडसड यांनी या तिघांवर कारवाई करत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केले आहे.

राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मिळून विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक, अमरावती शिक्षक, छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूने तिकीट न मिळालेल्या इच्छुकांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले होते.

अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाला सुटली असून, विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी तीनही बंडखोर नेते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोरील टेन्शन आणि आव्हान अद्यापही कायम आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही