प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलल्याच्या रागातून ५० ते १०० तरुणांच्या जमावाने आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक अमोल खुणे यांनी केला आहे. नारायण गडावरील दसरा मेळाव्याला मी जाऊ नये, यासाठी खुद्द जरांगे यांनीच माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा दावाही खुणे (Amol Khune) यांनी केला आहे.
रविवारी दुपारी बीड तालुक्यातील पाली गावानजीक असलेल्या नागनाथ मंदिरात खुणे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी तुळजापूरहून ज्योत घेऊन येणाऱ्या काही तरुणांनी मंदिराचे गेट बंद केले आणि खुणे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. जरांगे पाटील यांच्यावर का बोलतोस, अशी विचारणा करत हा हल्ला करण्यात आला.
या मारहाणीत अमोल खुणे यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर खुणे यांनी जरांगे यांना इशारा दिला असून, आता त्यांना सुट्टी देणार नाही आणि त्यांचे सर्व उद्योग बाहेर काढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- CJP च्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याने मनसे, युवा सेना आक्रमक; अमित व आदित्य ठाकरेंनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या
- नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची वादग्रस्त पोस्ट; महाकालचे दर्शन घेत म्हणाली, ‘ही वाईट वृत्ती…’
- मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरूनच माझ्यावर हल्ला; जुने सहकारी अमोल खुणे यांचा गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









