दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, नेहा बोराने धावत्या बसमधून दाखवला पोलिसांच्या क्रूरतेचा चेहरा

दिल्लीतील जंतरमंतर २.० आंदोलनात सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांची दडपशाही. नेहा बोराने धावत्या बसमधून व्हिडिओ शेअर करत पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

Published On: 

Delhi protest GenZ Neha Bora exposes police cruelty from inside detention bus

दिल्ली, 11 ऑक्टोबर: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ‘जंतरमंतर २.०’ आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता सलग दुसऱ्या दिवशीही राजधानीत तरुणाईचा (जेनझी) अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळाला. शेकडो आंदोलकांना रस्त्यावरून उचलून छावण्यांमध्ये बंदिस्त करण्यात आले. तरीही आंदोलकांनी जिथे पकडले गेले, त्याच ठिकाणी जंतरमंतर करत विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान सलग दुसऱ्या दिवशी आंदोलक नेहा बोरा हिने धावत कॅनॉट प्लेस गाठून जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (RAF) जवानांनी तिला ताब्यात घेत पुन्हा एकदा बसमध्ये बसवले.

ताब्यात घेतल्यानंतर नेहाने चालत्या बसमधून एक व्हिडिओ शेअर करत पोलिसांच्या क्रूरतेचा पर्दाफाश केला. या धावत्या बसचेच तुरुंगात रूपांतर करण्यात आल्याचा दावा तिने केला. खिडक्यांना जाळ्या आणि दुसऱ्या बाजूला काचा आहेत, तसेच आत कुलूप लावलेल्या चार छोट्या कोठड्या असून श्वास घ्यायलाही जागा नसल्याचे तिने व्हिडिओत दाखवले. पुरुष आंदोलकांना आई-बहीण आणि जाती-धर्मावरून अत्यंत अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या गुप्तांगांवर लाथा मारण्यात आल्याचा धक्कादायक आरोप नेहाने केला. तसेच आठ-सहा जणींना चार वेगवेगळ्या बसेसमध्ये कोंबून ठेवल्याचेही तिने सांगितले.

“अटकेआधीच या बसेसना तुरुंग बनवणे हाच दिल्ली पोलीस आणि सीआरपीचा हेतू आहे का?” असा संतापजनक सवाल नेहाने उपस्थित केला. “सीआरपीने अत्यंत क्रूरतेने आम्हाला ताब्यात घेतले. देशातील सामान्य जनतेविरुद्ध युद्ध पुकारण्यासारखीच ही कृती आहे. जनतेची सेवा करण्याऐवजी ज्ञानेश कुमार या चोराला वाचवण्यासाठी आणि आरएसएस-भाजपची दलाली करण्यासाठीच इतके सैन्य व पोलीस बळ वापरले जात आहे का?” अशी घणाघाती टीका तिने (Neha Bora) केली.

दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीजेपीच्या (CJP) नेत्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाकडून त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “आम्ही आंदोलन न करण्याच्या कोणत्याही बाँडवर स्वाक्षरी केलेली नाही,” असे दीपके यांनी ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे. सीजेपीच्या या घोषणेमुळे दिल्लीत पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. पोलिसांनी बंद केलेली इंटरनेट सेवा तत्काळ पूर्ववत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सीजेपीच्या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांनी तब्बल ५७ मेट्रो स्टेशन बंद ठेवली होती आणि चार माजी मुख्यमंत्र्यांसह सुमारे ७ हजार जणांना ताब्यात घेतले होते. एवढेच नाही तर, अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना पोलिसांनी चक्क विमानात घुसून अटक केली होती. या सर्व बळजबरीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर कडक ताशेरे ओढले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही