Share

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; राहुल, प्रियांका गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या राहुल आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले. काँग्रेस आणि भाजप नेत्यांची एकमेकांवर जोरदार टीका.

Published On: 

Rahul Gandhi and Priyanka Gandhi detained by police during Congress protest

प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या आंदोलनासाठी जंतर मंतरकडे जात असताना दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले. मात्र, ताब्यात घेतल्यानंतर दोन तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. गेल्या २४ तासांत दिल्ली पोलिसांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांना दोनदा ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले आहे.

या कारवाईवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस पक्ष आणि नेते याला घाबरणार नसल्याचे स्पष्ट केले. निवडणूक आयोग जे काही करत आहे, त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा आरोप खर्गे यांनी केला. तसेच, बुधवारी सुमारे ३०० विरोधी खासदारांना निवडणूक आयुक्तांची भेट घ्यायची होती, परंतु दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखून परवानगी दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कितीही खटले दाखल झाले तरी ते घाबरणार नाहीत आणि लोकांचे हक्क हिरावले जात असल्याचे जनतेला सांगतील, असे खर्गे म्हणाले. ज्ञानेश कुमार हे देशाचे कायदेशीर मुख्य निवडणूक आयुक्त नाहीत, हे सांगण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व मित्रपक्ष जंतर मंतरवर जाऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करतील, अशी घोषणा त्यांनी केली.

जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही

दुसरीकडे, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, असा इशारा सरमा यांनी दिला. १० ते २० हजार लोकांना एकत्र करून पंतप्रधान मोदींना रोखता येणार नाही, कारण त्यांच्यासोबत भारतातील कोट्यवधी लोकांची शक्ती आणि सनातन भारताचा आशीर्वाद असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींचा सलग तिसरा कार्यकाळ त्यांच्या नेतृत्वावरील लोकांचा विश्वास दर्शवतो. मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयांनी देशाला नव्याने आकार दिला असून त्यांच्या नेतृत्वाखाली एका नव्या भारताची उभारणी होत असल्याचे मत सरमा यांनी व्यक्त केले. याचबरोबर, काँग्रेस पक्षाने चीन सीमेवर सैन्याला वाऱ्यावर सोडले होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

काँग्रेस पक्ष मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही