Share

विधान परिषद निवडणूक: पुण्यात महायुतीत बंडखोरीची शक्यता; सतेज पाटील भाचीविरोधातच मैदानात

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात थेट लढत रंगणार आहे. तर शिवसेनेच्या मंगेश चिवटेंमुळे महायुतीत बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे.

Published On: 

Pune election Satej Patil campaigning against niece

पुणे, 5 ऑक्टोबर: राज्यातील विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आता चुरशीच्या बनल्या आहेत. रविवारी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले असून, पुण्यात महायुतीमध्ये बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. पुण्याच्या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटल्या असल्या, तरी शिवसेनेचे नेते मंगेश चिवटे यांनी पदवीधर मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या पक्षाने हर्षदा देशमुख-जाधव यांना संधी दिली आहे. या दोघींमध्ये थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असतानाच, शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे चिवटे यांनी माघार न घेतल्यास पुण्यात महायुतीला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

दुसरीकडे, काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी स्वतःच्या भाचीविरोधातच प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव या पाटील यांच्या भाची आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील म्हणाले की, घर फोडणे हा भाजपचा अजेंडा आहे, मात्र त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठीच आपण काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने आजगावकर यांना उमेदवारी दिली असून पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनाला सामोरे जाताना सतेज पाटील यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. एमपीएससीमध्ये झालेला घोळ मुख्यमंत्र्यांनाही मान्य असून त्यांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे, म्हणजे घोटाळा झाल्याचे त्यांना मान्य आहे, असे पाटील म्हणाले. या मुद्द्यावर ‘क्रेडिट वॉर’ करू नका, हे विद्यार्थी कुठलाही पक्ष म्हणून आलेले नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी करा म्हणजे सर्व तथ्य समोर येईल, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही