Share

“धर्म, सण घरापुरताच मर्यादित ठेवावा”; डीजेविरोधी लढ्याला सुमित राघवनचा पाठिंबा, विद्यानंद बापटांचा सत्कार

पुण्यात डीजेविरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांचा अमोल पालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनेते सुमित राघवन यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला.

Published On: 

Actor Sumeet Raghavan supporting Vidyanand Bapat against DJ noise pollution

पुणे, 27 सप्टेंबर: पुण्यात डीजेच्या विरोधात लढा देणारे विद्यानंद बापट यांना अभिनेते सुमित राघवन (Sumeet Raghavan) यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. “धर्म किंवा सण असू दे, तो घरापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. रविवारी (२७ तारखेला) ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते विद्यानंद बापट यांचा गौरव करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

‘मधुरजग प्रतिष्ठान’, ‘ब्राईट्स सोसायटी’ आणि ‘विचारवेध’ या संस्थांतर्फे या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चिन्मयी सुमित यांचीही उपस्थिती होती. बॅनर लावून बापट यांची खिल्ली उडवणाऱ्यांचा सुमित राघवन यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले की, “जेव्हा तुम्ही तार्किक किंवा वैचारिकदृष्ट्या एखाद्या गोष्टीचा सामना करू शकत नाही, तेव्हा अशी थातूरमातूर कृत्ये केली जातात.”

सुमित राघवन यांनी पुढे सांगितले की, मुले वर्ल्ड कप जिंकून आली तर सर्वांनी रस्त्यावर येऊन जल्लोष करणे समजण्यासारखे आहे. मात्र, सध्या रस्त्यांसारखी अनेक मोठी कामे प्रलंबित आहेत, आपला जोश तिकडे सत्कारणी लावला पाहिजे. बापट यांच्या या ध्येयवेड्या प्रयत्नांचे कौतुक करत, “आम्ही केवळ तुझ्या पाठीशी नाही, तर तुझ्याबरोबर आहोत,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी विद्यानंद बापट आणि आयोजकांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली. आता हा मुद्दा न्यायालय आणि कायदेमंडळाच्या पातळीवर लढणार असल्याचे बापट यांनी सांगितले. पुण्यात लांबलेल्या विसर्जन मिरवणुकांना परवानगी देणेच चुकीचे असल्याचे ते म्हणाले. “विसर्जन मिरवणुका लांबवणं हा गोमूत्र पिऊन आणि शेण खाऊन आलेला माज आहे,” अशा तीव्र शब्दांत बापट यांनी संताप व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

विद्यानंद बापट यांचा गौरव ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही