Share

‘लाली-लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येत नाही’; सावित्रीबाईंशी तुलना केल्याने रुपाली ठोंबरेंची चाकणकरांवर टीका

स्वतःची तुलना सावित्रीबाई फुलेंशी करणाऱ्या रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. लाली-लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Published On: 

Rupali Thombare criticizes Rupali Chakankar over Ashok Kharat case

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव आल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. यातच चाकणकर यांनी स्वतःची तुलना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी केल्याने, “लाली-लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही,” असा घणाघाती टोला रुपाली ठोंबरे यांनी लगावला आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. “माझ्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत. मी मुंबई उच्च न्यायालय ते दिल्ली कोर्ट सगळीकडे लढत आहे. मी महाराष्ट्राची लेक आहे, त्यामुळे खोट्या आरोपांना बळी पडणार नाही. चारित्र्यावर उडणारे शिंतोडे २०० वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी सहन केले होते. आजही रुपाली तीच सावित्रीची लेक म्हणून लढतेय,” असा दावा चाकणकर यांनी केला होता.

चाकणकरांच्या या विधानाचा समाचार घेत रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. सावित्रीमाईंचे नाव घेण्याची चाकणकरांची पात्रता नसल्याचे सांगत ठोंबरे म्हणाल्या, “महात्मा जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांची हयात अंधश्रद्धेविरोधात लोकांची जनजागृती करण्यात गेली. मात्र, तुम्ही राज्य महिला आयोगावर राहून महिलांना आधार देण्याऐवजी त्यांना भोंदूबाबाच्या शिकारीसाठी अलगदपणे पोहोचवले.” तसेच, “चाकणकरांचा वरचा मजला कमीच आहे, लाली-लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही,” अशी बोचरी टीकाही ठोंबरे यांनी केली.

 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही