Share

महाविद्यालयात अल्पसंख्याक बोगस विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्ती लाटली; बोगस विद्यार्थी दाखवून शासनाला गंडा

महाविद्यालयात बोगस विद्यार्थी दाखवून शासनाची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती लाटल्याप्रकरणी पाचोड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published On: 

Fake student scholarship scam uncovered in Sant Ishwarsing College Adul Paithan

किरण काळे पाटील, पैठण – Scholarship Scam: सरकारी योजनांचा पैसा खिशात घालण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील, याचा काही नेम नाही. पैठण तालुक्यातील आडूळ येथील एका महाविद्यालयातून असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तिथे चक्क गुजरातचे बोगस विद्यार्थी दाखवून केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचे पैसे लाटण्यात आल्याचा मोठा गौप्यस्फोट झाला आहे.

आडूळ येथील संत ईश्वरसिंग कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. १५ जून २०२१ ते १५ एप्रिल २०२२ या कालावधीत, म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये हा सर्व गैरप्रकार झाला असून, उच्च शिक्षण विभागाच्या तपासणी समितीने नुकतीच ही मोठी फसवणूक उघडकीस आणली आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुरुवारी ३ सप्टेंबर २०२६ रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर बनावट नावे; असा रचला गेला फसवणुकीचा डाव

पाचोड पोलिसांत देण्यात आलेल्या अधिकृत फिर्यादीनुसार, संत ईश्वरसिंग महाविद्यालयाचा अधिकृत संकेतांक (UDISE/AISHE: C-34339) वापरून परस्पर ऑनलाईन फॉर्म भरले गेले. यात गुजरातच्या भरूच आणि नर्मदा जिल्ह्यातील तीन विद्यार्थिनींची (दबीरुन नेसा, सोनई खातून, उलफोन नेसा) बनावट नावे थेट ‘नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल’वर नोंदवण्यात आली. या बोगस प्रक्रियेद्वारे शासनाची मोठी दिशाभूल करण्यात आली.

केंद्र शासनाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या ‘पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती’ योजनेचा हा पैसा होता. या तिन्ही बोगस विद्यार्थ्यांच्या नावे प्रत्येकी सहा हजार रुपये अशी एकूण १८ हजार रुपयांची रक्कम खात्यावर वळती करून घेण्यात आली आणि शासनाची फसवणूक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील उच्च शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्रकुमार किसनराव ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन अशोक पंडित यांनी हा अधिकृत FIR (प्रथम खबर क्र. ०३६६) नोंदवून घेतला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) च्या कलम ६६ (ड) नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. आता या शिष्यवृत्ती घोटाळ्याची पाळेमुळे कुठपर्यंत पसरली आहेत, याचा सखोल तपास पोलीस उप-अधीक्षक सुनील पाटील करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही